Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘ऐश्वर्या’सोबत घटस्फोट घेत असल्याची अभिषेक बच्चनची घोषणा? ; व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चित जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांची. गेल्या काही दिवसांपासून हे कपल चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या गेल्या काही महिन्यांपासून समोर येत आहेत. या दोघांचा घटस्फोट होणार असल्याचंही बोललं जात आहे. दोघांनीही यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या दोघांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं वारंवार मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहेत.

ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेत असल्याची अभिषेकची घोषणा –

अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात ऐश्वर्या आणि अभिषेक एकमेकांसोबत आले नाहीत, त्यांनी एकत्र फोटोही काढला नाही. अंबानींच्या कार्यक्रमात अभिषेक बच्चन कुटुंबासोबत पोहोचला होता आणि ऐश्वर्या आराध्यासोबत पोहोचली. ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबासोबत दिसली नाही, त्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या चर्चेत आल्या. या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनाही उधाण आलं. दरम्यान, हे सर्व सुरु असताना आता अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नात्यात दुरावा असल्याचा बातम्यांनतर अभिषेकचा व्हिडीओ व्हायरल –

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन विभक्त होणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत असताना आता अभिषेकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अभिषेक ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेत असल्याची घोषणा करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हे जोडपं खरंच घटस्फोट घेणार आहे का? या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

‘मी आणि ऐश्वर्या घटस्फोट घेतोय’

अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिषेक असं बोलताना दिसत आहे की, “जुलै महिन्यात मी आणि ऐश्वर्या आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.” दरम्यान, अभिषेक बच्चनच्या या व्हिडीओमध्ये मुलगी आराध्या बच्चनचाही उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ ‘डीपफेक’ असल्याचं समोर आलं आहे.

नेमकं सत्य काय?

घटस्फोटाची घोषणा करणाऱ्या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चनचा आवाज काहीसा वेगळा असल्याचं जाणवत आहे. याशिवाय अभिषेकचा हा व्हिडीओ लिप-सिंक होत नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. यामुळेच या व्हिडीओच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच हा व्हिडीओ मध्ये-मध्ये कट होत असल्याचंही जाणवत आहे, यावरुनचा हा व्हिडीओ एडिटेड असल्याचं स्पष्ट होत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles