Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट! ; योजनेबाबत घेतला मोठा निर्णय.

नागपूर : ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे आडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी या वर्षी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. या योनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतता. या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली होती, त्यानंतर लगेच जुलैपासून या योजनेची अंमलबाजावणी सुरू झाली. आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हापते जमा झाले आहेत. आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हापता अँडव्हास जमा करण्यात आला होता. म्हणजे ऑक्टोबरमध्ये महिलांच्या खात्यात एकाचवेळी तीन हजार रुपये जमा करण्यात आले. दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार?, याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.

जर राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2100 रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतुद केली जाईल, ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यात आहे.

आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे, ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनासठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच  मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 3050 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधणी – 1500 कोटी रुपये, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी, मुंबई मेट्रोसाठी अर्थ सहाय्य म्हणून – 1212 कोटी, आणि  मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी – 514 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles