Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक, ५ दहशतवादी ठार! ; सुरक्षा दल अलर्ट मोडवर, सर्च ऑपरेशन सुरूच.!

कुलगाम : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी दहशतदवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडली. कुलगाम जिल्ह्याच्या बेहिबाग पीएस या भागातील कद्देर या गावाजवळ सुरू आहे. वृत्तानुसार सुरक्षा रक्षकांनी 5 दहशतवाद्यांना ठार केले. यामध्ये दोन जवान जखमी झाल्याचे समोर येत आहे. या चकमकीनंतर आता सुरक्षा दलांनी या भागात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याचे समजते. लष्कराच्या चिनार कॉर्प्सने याविषयीची माहिती दिली आहे. दहशतवादी या भागात लपून बसल्याची माहिती समोर आली होती. सुरक्षा दलांना याविषयीची गुप्त बातमी मिळाली होती. त्याआधारे सुरक्षा दलांनी या भागात एक संयुक्त कारवाई सुरू केली. लष्कराला या भागात काही संशयास्पद हालचाली दिसल्या. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिले.

काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांत वाढ –

गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सातत्याने अशा कारवाया होत आहे. दहशतवादांना यमसदनाला पाठवण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरक्षा दलांनी 28 ऑक्टोबर रोजी जम्मूमधील अखनूर भागात 3 दहशतवाद्यांना ठार केले होते. तेव्हा सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तेव्हा सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन राबवण्यास सुरूवात केली आणि तीन दहशतवाद्यांना टिपले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.

लष्कराचे वाहन या गावाजवळून जात असताना या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने जवानांनी गावाला वेढले. तेव्हा दहशतवादी या भागात लपल्याचे समोर आले. लष्कराने सर्च ऑपरेशन केले. तेव्हा काही जणांच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. त्यांनी लागलीच गोळीबार सुरू केला. पत्युत्तरात जवानांनी गोळीबार केला. कुलगाम जिल्ह्याच्या बेहिबाग पीएस या भागातील कद्देर या गावाजवळ सुरू आहे. वृत्तानुसार सुरक्षा रक्षकांनी 5 दहशतवाद्यांना ठार केले. यामध्ये दोन जवान जखमी झाल्याचे समोर येत आहे. या चकमकीनंतर आता सुरक्षा दलांनी या भागात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles