Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

माऊली युवा प्रतिष्ठान, रेडी संस्थेच्या शुभारंभाचे औचित्य साधून महाआरोग्य शिबीराचे आयोजन.

वेंगुर्ला : श्री माऊली युवा प्रतिष्ठान, रेडी ह्या सामाजिक क्षेत्रातील रेडी गावातील युवकांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या संस्थेच्या शुभारंभाचे औचित्य साधून श्री माऊली युवा प्रतिष्ठान रेडी व SSPM लाईफ टाईम हॉस्पिटल,पडवे सिंधुदुर्ग व हिंद लॅब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रेडी येथे मोफत महाआरोग्य तपासणी तसेच रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा.
या शिबिरामध्ये नेत्र तपासणी तसेच कंबरदुखी, गुडघेदुखी, मणकेदुखी, मूळव्याध मुतखडा, भरणीया, अस्थमा तसेच स्त्रियांच्या संदर्भातील आजार ,हृदयाचे आजार या सर्व आजारांची तपासणी करून ज्या रुग्णांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये यावयाचे असेल ,तर आयुष्यमान भारत या सरकारच्या योजनेअंतर्गत ऑपरेशन्स व उपचार केले जातील. शिबिरास येताना आधारकार्ड व रेशनकार्ड तसेच उपचार सुरू असतील तर वैद्यकीय सल्ला घेत आहात ती सर्व तपासणी कागदपत्रे सोबत घेऊन यावे. त्याचं प्रमाणे रक्त तपासणी शिबिरामध्ये CBC Piped Profile HB, कावीळ तपासणी,थायरॉईड,KFT, महिला व पुरुष कर्करोग तपासणी इत्यादी महत्वपूर्ण रक्तांच्या तपासणी ह्या मोफत स्वरूपात होणार आहेत. तरी रक्त तपासणी साठी येणाऱ्यांनी सकाळी उपाशीपोटी रक्त तपासणी शिबिरासाठी यावेत.
तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा व रक्त तपासणी शिबिराचा जरूर लाभ घ्यावा,असे आवाहन श्री माऊली युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. निलेश रेडकर व सर्व पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

ADVT –

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles