वेंगुर्ला : येथील ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा असून त्यामुळे सर्व सामान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजय पिळणकर यांनी वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाचे औषध विभागाचे अधीक्षक संदीप सावंत यांचे लक्ष वेधले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेले दोन महिन्यांहून अधिक काळात येथील रुग्णालयात मिळणारी मोफत औषधे येथील औषध कक्षात गेल्यावर आज संपली आहेत दोन दिवसांनी या अथवा बाहेरून मेडिकल दुकानातून विकत घ्या,असे सांगितले जायचे.याबाबत बरेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक नाराजीही व्यक्त करायचे.बऱ्याच रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन होत नाही.त्यामुळे रुग्ण एकतर बाहेरून औषधे विकत घेताना एक – दोन दिवसांची औषधे विकत घेत असत किंवा रुग्णालयात औषधे उपलब्ध होईपर्यंत थांबतात.
याबाबत आज बुधवारी पत्रकार संजय पिळणकर यांनी अधिक्षक संदीप सावंत यांचे याबाबीकडे लक्ष वेधले असता,त्यांनी वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयात औषधांचा वरचेवर तुटवडा होत असल्याचे मान्य करून याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा, सर्व सामान्यांना भुर्दंड!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


