Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व इतर रिक्त पदे तात्काळ भरावीत.! ; अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपाध्यक्ष म. ल. देसाई यांची मागणी.

सिंधुदुर्गनगरी : केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदे गेले कित्येक वर्ष रिक्त आहेत तरी त्याची भरती झालेली नाही . तीन वर्षे यादी करूनही झालेली नाही तरी लवकरात लवकर ही भरती करावी, अशी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेची इच्छा आहे.  गेले तीन शिक्षणाधिकारी या जिल्हा परिषदेमध्ये होऊन गेले, परंतु तीनही शिक्षणाधिकाऱ्यांना फक्त यादी बनवण्याचे काम सोडून इतर भरती करण्याचे काम करता आलेले नाही. त्यामुळे शिक्षणाधिकारी शिक्षकांकडून केंद्रप्रमुखांकडून विस्तार अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करून घेतात आणि त्या कामाचे फलित म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगल्या योजना राबवल्या जातात. जिल्हा प्रत्येक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आहे आणि प्रत्येक अधिकारी आपलं प्रमोशन घेऊन आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा वरिष्ठ कार्यालयात जात आहेत, ही बाब आम्हा सिंधुर्गातील कर्मचाऱ्यांना अभिमानास्पद आहे. परंतु विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक जे या प्रवाहामध्ये काम करत असतात त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याची इच्छा एकही अधिकाऱ्यांची पूर्ण झालेली नाही.आज गेले तीन वर्ष यादीच बनवण्याचे काम सुरू आहे दरवर्षी शिक्षण विभाग ओरोस पंचायत समितीकडून याद्या बनवून घेतात आणि दोन महिन्यांनी परत नवीन याद्या बनवण्यास सांगतात यांच्याकडे अद्यावत यादी नाही . तरी या याद्या बनवण्याचे काम गेले तीन वर्षे गोड बोलून आपले काम पूर्णत्वास नेतात. परंतु प्रमोशन मात्र झालेले नाहीत आज मुख्य कार्यकारी अधिकारी एक महिन्याच्या रजेवर गेलेले किंवा प्रशिक्षणासाठी गेलेले आहेत आणि आपला चार्ज रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे त्यावेळी किती अडचणी निर्माण होतात . तश्याच अडचणी एखाद्या केंद्रप्रमुख चार्ज दुसऱ्या केंद्रप्रमुख कडे दिल्यानंतर होतात .सी ई ओंना ज्या अडचणी येतात त्या अडचणी केंद्रप्रमुखांना येतात एका केंद्रप्रमुखाकडे चार चार केंद्राचे चार्ज आहेत .त्यामुळे केंद्रप्रमुखांचा मुख्य जो जॉबचार्ट आहे किंवा विस्तार अधिकाऱ्याचा मुख्य काम आहे ते बाजूला राहते आणि कागदी घोडे नाचवण्याचं काम सुरू होते. ज्याप्रमाणे काम करता येत नाही तेव्हा शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत आहे. जे पात्र कर्मचारी आहेत त्यांना प्रमोशन मिळावं, ही संघटनेची इच्छा आहे जिल्हा परिषदेतील इतर कर्मचाऱ्यांना दोन दोन वेळा प्रमोशन झाली तरी शिक्षक कर्मचाऱ्यांना मात्र एकही प्रमोशन नाही. जे कर्मचारी स्वतः प्रमोशन घेतात परंतु शिक्षकांचे प्रमोशन त्यांना मात्र करता येत नाही तेव्हा बहुसंख्य कर्मचारी प्रमोशन मिळणार या आशेवर होते. परंतु ते आज प्रमोशन शिवाय सेवानिवृत्त होत आहे. ही बाब गंभीर आहे. स्वतः मात्र प्रमोशन घ्यायचं व हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळीच प्रमोशन द्यायचे नाही, सर्व संघटनानी प्रमोशनसाठी निवेदन आंदोलन केले, तरीही प्रमोशन होत नाही. यासाठी सर्व संघटनाना आंदोलन करण्याची पाळी आणू नये, ही नम्र विनंती आहे. शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी व टिकून राहाण्या साठी सर्व पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघचे उपाध्यक्ष म. ल. देसाई यांनी केली आहे.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles