सावंतवाडी : दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलने सामाजिक भान जागृत ठेवून चॅनेल च्या वतीने समाजात विधायक कार्य करणाऱ्या गुणवंतांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

यामध्ये श्री.श्रेयस मुंज ( युवा उद्योजक), सौ.ऐश्वर्या कोरगावकर ( युवा उद्योजिका), श्री.संतोष कानसे (युवा उद्योजक),श्री.शरद चंद्रशेखर पेडणेकर (युवा उद्योजक),
श्री. अक्षय काकतकर(युवा उद्योजक)
श्री.दिनेश गावडे (युवा उद्योजक),विनायक गावंस (समाजाभिमुख युवा पत्रकार), श्री.मयूर गवळी (उत्कृष्ट हार्मोनियम वादक),
श्री.युवराज लखम राजे भोसले
युवराजी श्रद्धाराणी भोसले (युवा उद्योजक -उद्योजिका) म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रम लवकरच होणार आहे अशी माहिती कोकण लाईव्ह ब्रेकिंग च्या वतीने देण्यात आली आहे.


