Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

वाल्मिक कराड असलेल्या पोलीस ठाण्यात ५ नवीन पलंग.? ; प्रशासनाचं स्पष्टीकरण अन् रोहित पवारांचाही निशाणा. 

बीड : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी (दि.31) पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर केज न्यायालयाने वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर वाल्मिक कराडची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. दरम्यान, वाल्मिक कराड असलेल्या पोलीस ठाण्यात 5 पलंग मागवण्यात आल्याची चर्चा सुरु झाली होती. त्याबद्दल पोलीस प्रशासनाने स्पष्टीकरण दिले असून हे पलंग आम्ही स्वत:साठी मागवले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, आता यावरुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

पंखा, AC देखील बसवता येतील का?, याचाही विचार करायला हवा.! : रोहित पवारांचा उपहासात्मक टोला.

रोहित पवार म्हणाले, बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

“बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत. नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला.!” – रोहित पवार.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles