Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

‘सोनुर्ली’ अन् न्हावेली नॅाट रिचेबल.!, BSNL टॅावर बंद.! ; टॅावर तात्काळ सुरु करा : उपसरपंच भरत गावकर यांची मागणी.

न्हावेली :  सोनुर्ली व न्हावेली येथील गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेले बीएसएनएल मोबाईल टॅावर गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेला मोबाईल टॅावर तात्काळ सुरु करा अशी मागणी सोनुर्ली उपसरपंच भरत गावंकर यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने केली.दरम्यान केबल तुटल्याने हा प्रॅाब्लेम उद्धवला असून उद्या संबंधित यंत्रणा प्रॅाब्लेम दूर करुन टॅावर पुनश्च कार्यान्वित करणार असल्याचे आश्वासन बीएसएनएलच्या अधिकाऱ्याने दिले.तर वारंवार केबल तुटण्याचे प्रकार आणि लाईट गेल्यावर नेटवर्क जाण्याचा प्रकार होत असल्याने यावर उपाययोजना राबवा अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली.
बीएसएनएलचे मोबाईल टॅावर बंद असल्याने सोनुर्ली आणि न्हावेली हे दोन्ही गाव गेले पाच दिवस नॅाटरिचेबल आहेत याबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही टॅावर सुरु करण्याबाबत काहीच हालचाली होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांसह उपसरपंच भरत गावंकर यांनी सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.गेली पाच दिवस नेटवर्क अभावी गावात समस्या निर्माण झाल्या आहेत.नोकरी व्यवसाय करणारे तसेच शालेय विद्यार्थ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे.सोनुर्ली गाव श्री देवी माऊली देवस्थानामुळे संपूर्ण जिल्ह्यात व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.याठिकाणी दररोज मोठ्या संख्येने भाविक भक्त आणि पर्यटक दाखल होत असतात बऱ्याचदा गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने पर्यटक तसेच भाविक भक्तांचा हिरमोड होतो.त्यामुळे तात्काळ नेटवर्क सुरु करण्यात यावे अशी मागणी श्री गावकर यांनी केली.तर सोनुर्ली गावातील काही वाड्या या न्हावेली टॅावरच्या क्षेत्रात येतात.त्यामुळे दोन्ही टॅावर तात्काळ सुरु होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी ॲाप्टिकल केबल तुटल्याने गेले पाच दिवस मोबाईल टॅावर बंद आहेत.सदर नियंत्रणेकडून उद्या गुरुवारी हे काम मार्गीलावण्यात येणार आहे.त्यामुळे उद्यापासून दोन्ही टॅावर कार्यान्वित होणार आहेत.मॅनपावर कमी असल्याने वेळेत कामे होत नाहीत परंतू ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता प्राधान्याने उद्या दोन्ही टॅावर कार्यान्वित करु असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.दरम्यान सोनुर्ली येथील मोबाईल टॅावरला बॅटरी बॅकअप नसल्याने लाईट गेल्यावर टॅावर बंद पडतो.त्यासाठी सोलर लाईट सिस्टिम अन्यथा अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध करुन द्या अशी मागणीही उपस्थित त्यांनी केली.यावेळी सदरचा टॅावर फोरजी सेवेमध्ये घेण्यात येणार आहे.तसेच अपग्रेड सिस्टीममध्ये सोलर सिस्टीमचे काम होणार आहे.त्यामुळे हा प्रश्न ही मार्गी लागणार असून त्यासाठी पुनश्च पाठपुरावा केला जाईल असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.यावेळी माजी सरपंच प्रणाली गाड,ग्रामसेवक तन्वी गवस,ग्रामसेवक तथा ग्रामस्थ मुकुंद परब,प्रविण गाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles