Tuesday, September 16, 2025

Buy now

spot_img

राज्यातील ‘ही’ धरणे झाली १००% फुल्ल! ; कोणत्या विभागात काय स्थिती?

पुणे : राज्यात यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली असून  पावसाच्या पाण्याने धरणे तुडुंब होत आहेत. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील प्रमुख धरणांपैकी असणारी पाच धरणे 100% भरली असून यंदा हजारो गावांची तहान भागणार आहे. राज्यात झालेल्या पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत असून बंधाऱ्यांमधून नदीपात्रांमध्ये विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शेती व सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत असल्याने दिलासा देणारं चित्र आहे.

भाटघर, वीर आणि उजनी धरण फुल्ल! 

पुणे विभागातील बहुतांश धरणे आता भरत आली असून भाटघर, वीर आणि उजनी धरण 100% ने भरले आहे. निरा देवघर धरणात 97.20%, चाकसमान 99.02%, पवना 95.27%, खडकवासला 81.43%, पानशेत 99.13%, डिंभे 83.79 टक्क्यांनी भरले आहे.  सध्या या सर्व धरणांमधून विसर्ग सुरू असून मुळा,मुठा, भीमा, मीरा नदीपात्रात पाण्याची आवक होत आहे.

सातारा. सांगली, कोल्हापूर मधील धरणांची ही स्थिती सध्या चांगली असून बहुतांश धरणे 80 टक्क्यांच्या पुढे गेली आहेत. कोल्हापूरचा दूधगंगा प्रकल्प 85.95 टक्क्यांनी तर राधानगरी 97.82 टक्के भरला आहे.

राज्यातील ही पाच धरणे 100% 

सोलापूर जिल्ह्यातील उजनी, साताऱ्यातील वीर, पुण्यातील भाटघर व आंद्रा, गोंदिया मधील इटियाडोह ही पाच धरणे 100 टक्क्यांनी भरली आहेत. पुणे. नाशिक विभागातील बहुतांश धरणांमध्ये चांगला पाणी साठा शिल्लक आहे. कोकणातील धरण साठा 90 च्या पुढे गेला असून मराठवाडा, अमरावती व नागपूर विभागात पाणी पातळीत वाढ होत आहे.

कोणत्या धरणांमध्ये किती पाणीसाठा? 

जलसंपदा विभागाने सादर केलेल्या राज्यातील महत्त्वाच्या धरण साठ्यांमधील  पाण्याच्या अहवालानुसार कोकणातील बहुतांश धरणे आता भरली असून 90% च्या पुढे उपयुक्त पाणीसाठा आहे. ठाण्यातील भातसा 92.53% तर सूर्या धामणी धरण प्रकल्पात 94.93% पाणी आहे. नाशिक व नगर जिल्ह्यातील मोठ्या व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा आता वाढला असून 80%च्या पुढे उपयुक्त जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. यात दारणा 92.96%, गंगापूर 88.97, गिरणा 36.96, तर अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा 95.28%, मुळा 72.14%, निळवंडे 83.12% भरले आहे.

राज्यातील विभागनिहाय धरणसाठा –

राज्यात झालेल्या जोरदार पावसानंतर आणि धरणविसर्गानंतर राज्याचा उपयुक्त सरासरी पाणीसाठा 67.87 % आहे. यात नागपूरच्या एकूण ३८३ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांमध्ये ७५.७१ टक्के, अमरावतीच्या २६४ धरणांमध्ये ६३.५६, मराठवाड्यातील ९२० एकूण धरणांमध्ये २६.७० टक्के पाणीसाठा राहिलाय. नाशिकच्या सर्व धरणांमध्ये ६१.८९ टक्के, पुण्यातील ७२० धरणांमध्ये ८३.३१ टक्के तर कोकणातील १७३ धरणे ८९.४२ टक्के भरली आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles