सावंतवाडी : कोकणचे सुपुत्र तथा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाटककार, कवी, लेखक डॉ. अनिल जिजाबाई तुकाराम कांबळे सरमळकर लिखित ‘Enemy Of America’ हे बहुचर्चित महत्वाकांक्षी पुस्तक पवित्र नाताळाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत न्यूयॉर्क येथील मॅनहॅटन येथे २५ डिसेंबर २०२४
रोजी प्रकाशित झाले आहे. येथील प्रकाशक ॲंथनी मॉरिस यांनी त्यांच्या Oberox या प्राकाशनाच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
‘The fox’ या आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी व यश मिळालेल्या अनिल कांबळे सरमळकर यांच्या नाटकानंतर परदेशात प्रकाशीत होणारे हे त्यांचे दुसरे पुस्तक असुन अमेरिकेत प्रसिद्ध होणारे पहिलेच पुस्तक आहे, या निमित्त अनिल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
गेल्या पाच वर्षांच्या काळात प्रसिद्ध होणारे हे अनिल यांचे चौथे पुस्तक आहे.तथापि The Fox, Its Already Tomorrow, Death of Arts या त्यांच्या आधी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांनी अनिल कांबळे सरमळकर यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळवुन दिली आहे. तसेच थेट अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या Enemy of America या पुस्तकामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाचक व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचे पुन्हा त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले आहे.
Enemy of America हे पुस्तक कोणते भाष्य करते ? त्याचा लेखन फॉर्म कोणता आहे? या पुस्तकात लेखनात कोणते नवे प्रयोग करण्यात आले आहेत ? हे पुस्तक अमेरिकन मानसिकता राजकारण अर्थकारण साम्राज्यवाद इत्यादी बद्दल आहे का की या लेखनात अमेरिकेबद्दल काहीच लिहिले गेले नाही ? इत्यादींबद्दल वाचकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे.

आपल्या इंग्रजी लेखनाने उत्तरोत्तर जागतिक रंगभूमी साहित्य व वैचारीक वर्तुळाचे लक्ष वेधून घेणाऱ्या अनिल कांबळे सरमळकर यांचा इथवरचा प्रवास एकाकी व खूपच कष्टप्रद आहे. त्यांचे लेखन एक नवा मानदंड निर्माण करत आहे व तोही जागतिक स्तरावर ! तसेच कोकणातील एका छोट्या गावातील असूनही आज त्यांना आंतरराष्ट्रीय प्रकाशक मिळत असुन पुस्तक थेट अमेरिकेत प्रकाशित करण्याचे ते धाडस करीत आहेत हे कोकणसाठी अभिमानास्पद आहे.
सावंतवाडी तालुक्यातील एका दुर्गम गावातून येत अत्यंत प्रतिकूल काळ व परिस्थितीवर मात करत इंग्रजीतुन उच्च शिक्षण घेत इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवित त्यांनी आज जागतिक साहित्यात प्रवेश केला आहे व आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे म्हणुन लेखक अनिल जिजाबाई कांबळे यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
ADVT –




