सावंतवाडी : आरोंदा हायस्कूल आरोंदा, या माध्यमिक प्रशालेच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी गेले दोन महिने परिश्रमाने तयार केलेल्या कार्यानुभव अंतर्गत उपक्रम माध्यमातून विविध भाज्यांची निर्मिती केली आहे. त्यातील उत्पादित भाज्यांचे शालेय पोषण आहारामध्ये उपयोजन करण्यात आले. स्वनिर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांना मिळाला. त्याचबरोबर प्रशालेच्या शिक्षिका सौ. कोरगावकर यांनी सहकारी शिक्षक – शिक्षकेतरांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांकडून ‘भाजी निर्मिती’ करून घेतली. अशा प्रकारचे उपक्रम सर्व वर्गांनी राबवावे, यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सिद्धार्थ गोपाळ तांबे यांनी सौ. कोरगावकर व विद्यार्थी – विद्यार्थिनी आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या शिक्षक – शिक्षकेतरांचे तसेच विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचे भोजन देणा-या पोषण आहार स्वयंपाकी साळगावकर व तळवणेकर काकी यांचे अभिनंदन केले व सर्वांनी सहकार्याने काम करण्याचे, आवाहन केले आहे.
ADVT –