Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

बांदा पानवळ शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा.! ; रंगोत्सव कार्यक्रमात राज्यात निवड.

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कला व क्रीडा विभाग यांच्या वतीने इयत्ता तिसरी ते आठवी विद्यार्थी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रमात बांदा पानवळ शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विभाग स्तरावर आपली मोहर उमटून राज्यस्तरावर निवड झाली.

रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत अनुभवात्मक अध्ययन आधारित उत्कृष्ट कृती राज्यस्तरावर सादरीकरण करण्याची प्रथमच संधी सिंधुदुर्गातील बांदा पानवळ शाळेला मिळाली असून जिल्हाभरातून विशेष कौतुक होत आहे
नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनुभवात्मक अध्ययनाची गरज विचारात घेऊन बांदा पानवळ शाळेतील शिक्षक साहित्यिक व कवी मनोहर परब व सुनिता कदम या दोन्ही शिक्षकांनी मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्जनशील अध्यापन शास्त्रीय पद्धतीचा वापर करून अनुभवात्मक अध्ययन आधारित उत्कृष्ट कृती सादर करण्यात आली राज्यभरातून अनेक शालेय गटातील अध्ययन कृतीचा सहभाग दर्शविला होता. रंगोत्सव कार्यक्रमात आठ विभागाकडून चोवीस उत्तम अध्ययन कृतींची निवड करण्यात आली असून बांदा पानवळ शाळा लक्षवेधी ठरली. या अध्ययन कृतीचा लाभ महाराष्ट्रातील शिक्षकांना अध्यापनात दिशादर्शक म्हणून नक्कीच उपयोगी व्हावा हा महत्त्वाचा उद्देश आहे यासाठी एससीईआरटीच्या वेबसाईटवरून मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे.
मनोहर परब हे उपक्रमशील शिक्षक असून विद्यार्थी निर्मिती तीन पुस्तके संपादित केली असून स्वलिखित सात पुस्तकांचे लेखन प्रकाशित केले. तसेच ते बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ पुणे समितीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कलेच्या माध्यमातून थेट अध्यापन कृतीची जोड निर्माण व्हावी आणि कलेचा अध्यापन विषयाची समन्वय घेण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण कृतीची निवड करण्यात आली रंगोत्सव कार्यक्रमाचे थेट सादरीकरण महात्मा फुले हॉल एससीईआरटी पुणे या ठिकाणी होणार असून मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविले जाणार आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आरती सावंत, मनोज गुळेकर,समीर पेळपकर, रेश्मा वरक,अपर्णा मरळ,ऋतुजा हडफडकर, योजना साईल, नेत्रा शिंदे ,कविता मांजरेकर, इत्यादीने शुभेच्छा दिल्या या रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत बांदा पानवळ शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .यावेळी रंगोत्सव कार्यक्रमात योग्य मार्गदर्शन डाएट प्राचार्य राजेंद्र कांबळे तसेच ज्येष्ठ अधिव्याख्याता शाहीर बाबुराव कांबळे तसेच सर्व अधिकारी वर्ग यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles