Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

वेंगुर्ला भाजपा तालुका कार्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.!

वेंगुर्ला : सनातन संस्कृति आणि हिंदु धर्माला वैश्विक मंचावर पुनर्स्थापित करणारे महान संन्यासी, युग प्रवर्तक चिंतक, युवांचा प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. या निमित्त स्वामी विवेकानंद यांना कोटी कोटी नमन. युवकांचे प्रेरणास्थान विवेकानंद यांच्या जयंतीदिनी देशात ‘राष्ट्रीय युवा दिवस’ साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की, हिंदू धर्मच मानवतेचा खरा मार्गदर्शक आहे. चला, ‘राष्ट्रीय युवा दिवस’ च्या या दिवशी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना आत्मसात करून बलशाली राष्ट्र निर्माणाचा संकल्प करुया , असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले .

स्वामी विवेकानंद यांनी राष्ट्र उभारणीसाठी आणि विकासासाठी देशातील तरुणांना स्फूर्ती दिली. तुम्हीच तुमचे भाग्यविधाते आहात, या उपदेशाद्वारे त्यांनी अनेक थकलेल्या, हरलेल्या तरुणांना जीवन जगण्याची एक नवीन आशा दिली. हिंदू संस्कृतीबद्दलचा लोप पावत असलेला स्वाभिमान स्वामीजींनी आपल्या कार्याद्वारे पुर्नजागृत करण्याचे काम केले. तरुणांना स्फूर्ती देणारे युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम व सर्व युवकांना युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
यावेळी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी मच्छिमार नेते वसंत तांडेल व दादा केळुसकर , बुथप्रमुख सुधीर पालयेकर , सोशल मिडीयाचे अमेय धुरी , युवा ता.सरचिटणीस वैभव होडावडेकर , प्रितम ( पिंटु ) सावंत , बाळकृष्ण परब , गौरेश खानोलकर , कौस्तुभ वायंगणकर , संतोष सावंत , मधुकर धावडे , ऋषिकेश तेरेखोलकर , घनश्याम मोर्जे इत्यादी युवक उपस्थित होते .

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles