संजय पिळणकर.
वेंगुर्ला : उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग डॉ. श्रीपाद पाटील यांच्या सूचनेनुसार व निवासी वैद्यकीय अधिकारी सिंधुदुर्ग डॉ.सुबोध इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दी २८,२९ व ३० जानेवारी २०२५ रोजी वैद्यकीय व दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये भिषक, शल्यचिकित्सक,बालरोगतज्ञ,प्रसूती व स्त्रिरोगतज्ज्ञ,नाक,कान व घसा तज्ञ व दंत चिकित्सक यांचे मार्फत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.तसेच दी २८ जानेवारी २०२५ रोजी रुग्णांची तपासणी व रोगनिदान करण्यात येणार असून दी २९ जानेवारी २०२५ रोजी तपासणी अंती निवडलेल्या शस्त्रक्रियापात्र रुग्णांना शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच वैद्यकीय चाचण्या व औषधोपचार मोफत करण्यात येणार आहे.
यावेळी आरोग्य प्रदर्शनाद्वारे सकस आहार असंसर्गजन्य आजार,माता व बालसंगोपन,जलजन्य व किटकजन्य आजार यांची माहिती देण्यात येणार आहे.आभाकार्ड, अवयवदान जनजागृती व आयुष्य मान कार्ड काढण्यात येणार आहे.
तरी गरजू रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी वेंगुर्ला डॉ.लीलाधर लिलाके व वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला डॉ.संदीप सावंत यांनी केले आहे.


