कुठठाळी (गोवा) : राज्य सभा खासदार निधी योजने अंतर्गत गोव्यासारख्या अहिंदी भाषिक प्रदेशात हिंदी भाषेच्या विकासाच्या रुपाने 209 शाळांमधील या पुस्तक वितरणाचा लाभ निश्चितच होईल. पण हा उपक्रम राबविण्यात कार्यक्षम शिक्षण उपसंचालक डाॅ. उदय गांवकर याच्या अथक प्रयत्नामुळेच हे शक्य झाले, तेव्हा आपण संबंधित अधिकारी व सत्कार मूर्तीच्या हिंदीसाठी करीत असलेल्या कार्याबद्दल त्याचे अभिनंदन करतो, असे मत प्रमुख पाहुणे राज्य सभेचे माजी खासदार विनय तेंडुलकर यानी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे माजी खासदार विनय तेंडुलकर, सन्माननीय पाहुणे उत्तर गोवा (दोन) अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण हिरे परब, शिक्षण खात्याच्या केंद्रीय शिक्षण केंद्राचे उपसंचालक डाॅ. उदय गांवकर, केंद्रीय शिक्षण विभाग शिक्षण अधिकारी रीता फातिमा फर्नांडिस काल्डेरा, तिसवाडी भागशिक्षणाधिकारी सौ.निता फळदेसाई, पुस्तक वितरण उपक्रम संयोजक मुकेश कुमार उपस्थित होते. यावेळी सन्माननीय पाहुणे प्रवीण परब यानी असा आगळा वेगळा खासदार निधीतून उपक्रम आपण पहिल्यांदाच अनुभवतो असे सांगून आयोजकांचे तोंडभरून कौतुक केले.
यावेळी उत्तर गोव्यातील एकूण 101, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयानां हिंदीची पुस्तके प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आली. तसेच हिंदी भाषेच्या प्रचार प्रसार, विकासासाठी व साहित्यिक योगदान देणारे डाॅ आशा गहलोत (उपप्राचार्य व हिंदी विभागाध्यक्ष सरकारी महाविद्यालय, मार्शल गोवा), प्रा. सुनील जगन्नाथ शेट (दिपविहार उच्च माध्यमिक विद्यालय, सडा वास्को, गोवा), प्रा. तृप्ती प्रभु आजगांवकर (एस.एस.आंगले उच्च माध्यमिक विद्यालय, माशे काणकोण), श्रीमती जयश्री राॅय (साहित्य योगदान) डाॅ. प्रदीप जटाळ (श्रीमती पार्वतीबाई चौगुले काॅलेज मडगांव)श्री मिलिंद काकोडकर (साहित्य योगदान)यांचा शाल, प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र व पुस्तक संच देऊन प्रमुख पाहुणे विनय तेंडुलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सुरवातीला सर्व मान्यवरांकडून दिप प्रज्वलित करण्यात आले. डाॅ उदय गांवकर यानी स्वागत व प्रास्ताविक करून उपक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
रीता काल्डेरा यांनी सर्व पाहुण्यांची ओळख करून दिली.
सत्कार मूर्ती प्रा. सुनील शेट व डाॅ. आशा गहलोत यानी सत्कारादाखल मनोगत व्यक्त करीत आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिताराम नाईक यानी तर आभार प्रदर्शन भागशिक्षणाधिकारी निता फळदेसाई यांनी केले. हा कार्यक्रम पणजी कांपाल येथील बालभवन च्या सभागृहात संपन्न झाला.

फोटो ओळी : शिक्षण खात्याच्या व सेंट्रल शिक्षण विभाग तर्फे आयोजित बालभवन पणजी येथील पुस्तक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे राज्य सभेचे माजी खासदार विनय तेंडुलकर, डावीकडून रीता काल्डेरा, मुकेश कुमार, प्रवीण परब, डाॅ. उदय गांवकर,सौ.निता फळदेसाई व मागे उभे सुनील शेट, तृप्ती प्रभु आजगांवकर, डाॅ.आशा गहलोत, जयश्री रॉय, मिलिंद काकोडकर व डाॅ.प्रदीप जटाळ.


