Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी मंत्री नितेश राणे तर धनंजय मुंडेंना मोठा धक्का! ; बीडचे नवे पालकमंत्री कोण?

  • रूपेश पाटील.

मुंबई : मोठी बातमी समोर येत आहे, पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी मंत्री नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वठिकाणी जल्लोष पाहायला मिळत आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. तर मंत्री धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचं पालकमंत्रिपद होतं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. धुळ्याचं पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.  वाशिमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे. संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत. उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असणार आहेत.

धनंजय मुंडेंना धक्का –

राज्यात सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं आहे. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र त्यांचं नाव या यादीमधून वगळण्यात आलं आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. मात्र धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी करण्यात येत  होती.

अखेर बीडचं पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडेच राहिलं आहे, मात्र धनंजय मुंडे यांना डच्चू मिळाला असून, बीडचे नवे पालकमंत्री हे आता अजित पवार असणार आहेत. बीड सोबतच अजित पवार यांच्याकडे पुण्याचं देखील पालकमंत्रिपद असणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री असणार आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles