Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

प्रा. खानोलकर यांच्या ‘एक समृद्ध लोककला – दशावतार’ पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रकाशन.!

मुंबई : भारतातील पहिले अखिल भारतीय भजन संमेलनाचा उद्घाटन समारंभ नुकताच दादर माटुंगा कल्चरल सेंटर यशवंत नाट्यगृह शेजारी, माटुंगा (प.) मुंबई येथे संपन्न झाला. या संमेलनात प्रा.वैभव खानोलकर यांच्या ‘एक समृद्ध लोककला -दशावतार’ पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.या वेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे  उपस्थित होते आहेत.

प्रा.खानोलकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील खानोली गावचे सुपुत्र असुन त्यांनी कोकणातील मानबिंदू असलेल्या दशावतार लोककलेवर संशोधनात्मक अभ्यास करून दशावतार लोककलेची समृद्धता या पुस्तकातुन वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्रातील डिंपल पब्लिकेशन मुंबई , अशोक मुळे आणि कौस्तुभ मुळे यांच्या माध्यमातून होणार असुन या पुस्तकाला प्रस्तावना दशावतार लोककलेवर पहिली डॉक्टरेट मिळवणारे वेंगुल्याचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध लेखक डॉ.अशोक भाईडकर यांची आहे.
एक समृद्ध लोककला- दशावतार या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध डिझायनर श्री महेंद्र जुवलेकर (श्याम आर्ट्स) यांनी केले असून या मुखपृष्ठावर लोकराजा सुधीर कलिंगण यांचा श्रीकृष्ण भुमिकेतील फोटो असुन यात पप्पू नांदोस्कर यांच्या करारी खलनायकीची छबी दिसते तर या मृखपृष्ठावर कोकणचे बाल गंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांची सात्विक मृद्रेतील फोटो असुन अलिकडच्या काळातील सुप्रसिद्ध दशावतार कलावंत दत्तप्रसाद शेणई यांची प्रसन्न हास्य मुद्रेचा फोटो आहे
याच बरोबर धयकाल्यातील संकासूर,महागणपतीचा मुखवटा आणि त्याच्या समोरी पेटता कंदील हा जुन्या दशावताराची आठवण करून देतो तर गदा ही बदलत्या काळातील दशावतारातील नाविन्यपूर्ण बदल प्रतिबिंबित करते.
मलपृष्ठावर दशावतारातील महत्त्वाचे अंग असणारी संगीतसाथ असुन सोबतच कलावंतांच्या भुमिका सादरीकरण करण्यात पुर्वीची तयारी करतानाचा फोटो आहे.
एकंदर पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ अप्रतिम असल्याची भावना यावेळी लोककला अभ्यासक डॉ सदानंद मोरे यांनी बोलून दाखवली.
या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार, भजन सम्राट लोकरे बुवा,भजन सम्राट हर्याण बुवा, मालवणी कवी दादा मडकईकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिद्धी म्हात्रे या सुप्रसिद्ध निवेदीकेने केले.
लवकर हे पुस्तक रसिकांच्या भेटीला येणार असुन दशावतारातील वैविध्यपूर्ण माहितीचा खजिन्यात अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles