Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांची यशस्वी शिष्टाई! ; ओटवणे गावठणवाडी येथील विजय व महेश गावकर यांचे उपोषण स्थगित!

सावंतवाडी : ओटवणे सरपंच यांनी सामायिक घराच्या असेसमेंटमध्ये परस्पर फेरफार करीत सामायिक घर एकाच व्यक्तीच्या नावावर केले. त्यामुळे नियमबाह्य असेसमेंट रद्द करून घराची फेर आकारणी करण्यासह ओटवणे सरपंच आत्माराम शिवराम गावकर यांनी आपल्या अधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी मागणी करत प्राणांतिक उपोषण छेडण्यात आले होते. माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांनी या उपोषणास भेट देत ठोस आश्वासन दिले. यानंतर तुर्तास हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

ओटवणे गावठणवाडी येथील विजय अनंत गावकर आणि महेश सुरेश गावकर यांनी सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण छेडण्यात आले होते. ग्रामपंचायत घर क्रमांक २५९अ (वसंत शिवराम गावकर), २५९ ब (सुरेश शिवराम गावकर),२५९ क (विजय अनंत गावकर), घर क्र २६० (शिवराम शंभा गावकर) यांच्या नावे वडीलोपार्जित सामायिक घर होते. सदरचे घर जीर्ण झाल्यानंतर नवीन बांधण्यात आले. त्यानंतर पूर्वीप्रमाणे या घराची घरपट्टी आकारण्यासाठी अर्ज करण्यात आला. मात्र, सरपंचांनी नियमाप्रमाणे या अर्जाचा मासिक बैठकीत विषय घेतला नाही. त्यानंतर शिवराम गावकर यांचे भाऊ प्रभाकर गावकर यांनी घर क्रमांक २६० ची फेर आकारणीची मागणी केल्यानंतर ग्रामसेवकांनी हा विषय ग्रामसभेच्या अधिकार कक्षेत येत नसल्याचे सांगूनही सरपंचांनी बेकायदेशीरपणे हा विषय ग्रामसभेत घेत मंजूर करताना संपूर्ण घराची कर आकारणी शिवराम गावकर यांच्या नावे केली. याबाबत गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी सदर ग्रामसभेतील ठरावाद्वारे केलेली कार्यवाही बेकायदेशीर असल्याचे ग्रामपंचायतीला दोन वेळा सांगुन नियमानुकुल कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मात्र ग्रामपंचायतीने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे घर क्र २६० चा असेसमेंट रद्द करून या घराची फेरआकारणी करावी तसेच सरपंचांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याबद्दल त्यांच्यावर नियमोचित कारवाई करावी अशी विजय गावकर आणि महेश गावकर यांनी करत प्राणांकीत उपोषण छेडले होते. यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी उपोषण स्थळी भेट देत कारवाईचे आश्वासन दिले. तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडून १५ दिवसात ग्रामपंचायतीने केलेल्या कार्यवाहीबाबत चौकशी करून नियमबाह्यबाबी आढळुन आल्यास तो अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प यांचाकडे सादर करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. यावेळी आम. दीपक केसरकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, शिवसेना माजगाव विभागप्रमुख उमेश गांवकर आदी उपस्थित होते ‌

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles