Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

आ. निलेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी घडविले नानेली येथील महिलांना मोफत देवदर्शन! ; सरपंच वंदना आरेकर, शिवसेना कार्यकर्ता शिवाजी आरेकर यांचा पुढाकार!

कुडाळ : कुडाळ- मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या माध्यमातून तसेच सरपंच सौ.वंदना आरेकर,शिवसेना कार्यकर्ता शिवाजी आरेकर यांच्या पुढाकारातून नालेली गावातील ७७ महीला व ४ पुरूष अशी ८१ मंडळींना अक्कलकोट, नरसोबाची वाडी,तुळजापूर,पंढरपूर आदी ठिकाणची मोफत सहल आयोजित करण्यात आली. आज सकाळी नानेली सातेरी मंदिर येथून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत म्हणाले की, कुडाळ – मालवण मतदारसंघातून निलेश राणे विजयी झाल्यावर महीलांना मोफत देवदर्शन सहल घडवून आणेन,असे अभिवचन दिले होते. त्याचीच पूर्तता म्हणून एकूण २ दिवसांची सहल आयोजित करण्यात आली. त्यामुळे नानेली मधील महिला मंडळीमधून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles