देवगड : सिंधू संजीवन संस्था, देवगड आयोजित आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) पुरस्कृत ‘हर घर भगवत गीता’ या उपक्रमा अंतर्गत दिनांक २४, २५, २६ जानेवारी २०२५ असे सलग तीन दिवस, कुणकेश्वर, तळेबाजार, वाडा, फणसगाव या विभागांतील ६ वी ते १० वी या शालेय विद्यार्थ्यांना, महीला बचत गट प्रतिनिधी, सामाजिक, व्यवसायीक, व्यक्तींना विनामुल्य १२५१ भगवत गीता प्रती वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख प्रवक्ते श्यामकुंड प्रभुजी उर्फ डॉ. संजय परब ज्यांनी इस्कॉन परिवाराची २५ वर्षापेक्षा जास्त सेवा करत भगवत गीतेचा उपदेश घरोघरी पोचवला आणि तीचे आपल्या जिवनात काय महत्त्व आहे आणि गीता वाचने का आवश्यक आहे त्यासाठी वेगवेगळी उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे, या १६ अक्षरी मंत्राचे नामस्मरण करुन या मंत्राचे जीवनातील महत्त्व सांगितले या कार्यक्रमासाठी कणकवली इस्कॉन सेन्टर मधुन श्री आनंदवर्धन प्रभुजी, दाऊजी बलराम प्रभुजी, कुमार पाटील प्रभुजी आदी मान्यवरांनी देखील विद्यार्थ्यांना बहुमुल्य असे मार्गदर्शन केले. नेव्ही आॉफिसर श्री. मंगेश दळवी आणि श्री कॕप्टन कवली यांचे देखील सहकार्य या उपक्रमाला लाभले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (गोविंद) घाडी आणि इतर संचालक तसेच आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ ( इस्कॉन ) कणकवली सेन्टर येथील पदाधिकारी यांच्या पुढाकाराने, तसेच शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवर यांच्या सहकार्याने कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरूवात वाडा हायस्कूल येथून करण्यात आली कार्यक्रमासाठी वाडा हायस्कुल मुख्याद्यापक श्री. घस्ती सर आणि त्यांचे शिक्षकवृंद तसेच माजी विद्यार्थी श्री. रुपेश जधव, व्यवसायिक श्री सचिन गावकर, तळेबाजार हायस्कुल मुख्याद्यापक मा. श्री. राजेश वाळके व इतर शिक्षकवृंद, फणसगाव मुख्याद्यापक श्री. विजय पाटील सर आणि शिक्षकवृंद कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष श्री गणेश वाळके, खजिनदर श्री पेडणेकर, माजी अध्यक्ष श्री संतोष लब्दे, व्यवस्थापक श्री रामदास तेजम, सरपंच श्री महेश ताम्हणकर, आणि इतर पदाधिकारी, तेजस्वी महीला ढोल ताशा पथक प्रतीनिधी पुनम मयेकर, वैदेही प्रभु, तेजस्वीनी कदम, वैष्णवी कदम, ग्रामसेवक पांडुरंग शेटगे, ग्रामसेवीका प्रांजल शेटगे, सामाजिक कार्यकर्ते श्री युवराज घेवदे, श्री दिनेश राणे, श्री जितेंद्र मेस्री, दृष्टि इव्हेंट्स प्रमुख श्री प्रदिप वसंत कोकम, यादी मान्यवर उपस्थित होते.

तळेबाजार जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता १ ली मध्ये शिकणारी कु.सृष्टी योगेश शिंगरे हिने राम रक्षा स्रोत म्हणून कार्यक्रमाचे वातावरण भक्तीमय केले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी दर रविवारी सकाळी आपल्या वाडीतील मंदिरात एकत्र येऊन याचे वाचन व स्मरण करण्याचे आवाहन देखील संस्थे मार्फत विद्यार्थ्यांना करण्यात आले. भविष्यात या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करुन सामुहीक भगवत गीता वाचन कार्यक्रमाचे देखील आयोजन सिंधू संजिवन संस्था देवगड यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. तसेच अशाप्रकारचे नावीन्यपूर्ण आणि संस्कारक्षम उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत.


