देवगड : देवगड तालुक्यात गव्यांचा वावर असून गव्यांच्या कळपाने अनेकदा चारचाकी व दुचाकी वाहनांवर हल्ले केल्याच्या घटना ताज्या असताना सोमवारी ११ वाजता गव्यांच्या कळपाने आरे हायस्कूल परिसरात आपला मोर्चा वळविला. अचानक हायस्कूल परिसरात दाखल झालेल्या कळपामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आरे गावचे माजी सरपंच महेश पाटोळे यांनी तत्काळ वन विभागाला फोन करून वनरक्षक राठोड यांना बोलावून घेतले.



