दोडामार्ग : तालुक्यातील तळकट येथील मानसी मनोहर देसाई (३८) या महिलेचा झोळंबे येथील
शेतविहिरीत तोल जाऊन पडून दुर्दैवी मृत्यू झाला. तळकट येथील मानसी मनोहर देसाई हिने झोळंबे व तळकट सीमेवर नारळ व सुपारी बागायत भाडेतत्त्वावर घेतली होती. त्या बागायतीत मानसी ही नेहमीप्रमाणे एकटीच सुपारी गोळा करण्यासाठी व बागायतीला पाणी लावण्यासाठी गेली होती. यावेळी बागायतीतील शेतविहिरीजवळ ती काही काम करण्यासाठी गेली असता तिचा तोल जाऊन ती त्या विहित पडली व गुदमरून तिचा मृत्यू झाला.
मानसी हिचा नवरा गोव्यातील एका स्कूलबसवर कामाला आहे. तो घरी आला असता त्याला आपली पत्नी घरी दिसली नाही. यावेळी त्याने शोध घेतला असता ती शेतविहिरीत मृतावस्थेत आढळली. यावेळी दोडामार्ग पोलिसांना याबाबत माहिती दिली. तिच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे.


