Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

आ. निलेश राणेंच्या दणक्यानंतर हॉस्पिटल प्रशासन आले वठणीवर.! ; संबंधित पेशंटच्या नातेवाईकांचे वाचले तब्बल १५ लाख रुपये.

मुंबई : कोकणातील गणेश किर या युवकाचा ३ महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याच्या यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु संबंधित हॉस्पिटलने अतिरिक्त शुल्क आकारत तब्बल २४ लाखांवर नेऊन ठेवले. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना १५ लाखांचा अतिरिक्त भुर्दंड बसत होता. पेशंटच्या नातेवाईकांनी ही बाब आ. निलेश राणेंच्या कानावर घातली. आ. निलेश राणे यांच्या दणक्यानंतर हॉस्पिटल प्रशासन वठणीवर येत रुग्णाला डिस्चार्ज दिला. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचे तब्बल १५ लाखांचे होणारे नुकसान टळले.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश किर नामक युवकाचा ३ महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. मुंबईतील एका पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये या मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णाच्या नातेवाईकांनी शस्त्रक्रियेसाठी लागणारे ६.९० लाख एवढे रुपये इकडून तिकडून जमा केले. परंतु शेवटचे ३ लाख भरायला विलंब होत असल्याने रुग्णाला डिस्चार्ज देत नव्हते. तब्बल दीड महिने या रुग्णाला हॉस्पिटल मधून बाहेर पडण्यासाठी वाट पाहावी लागली. बघता बघता हॉस्पिटलचे बिल २४ लाखांवर येऊन पोहोचले. या रुग्णाची लाचार आई मदतीसाठी सर्वांना हाक देत होती. परंतु कोणीही मदत करत नसल्याने साश्रू नयनांनी दररोज सायंकाळी घरी जात होती. मुंबईतील राजकीय पक्षांच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या कानावर घालून देखील या माऊलीला न्याय मिळत नव्हता.

अखेर शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आमदार निलेश राणेंच्या ही बाब कानावर घातली. आमदार राणे यांनी आपल्या राणे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना कॉल करून हॉस्पिटलला भेट देण्यास सांगितले. तसेच जोपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत माझे पदाधिकारी तुमच्या केबिनच्या बाहेर ठाण मांडून बसतील अशी सक्त ताकीद हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली. हॉस्पिटल प्रशासनाला राणे स्टाईल दणका दिल्यानंतर प्रशासन वठणीवर आले. त्यांनी संबंधित रुग्णाला दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज दिला. आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने गणेश कीर तब्बल तीन महिन्यांनी आपल्या घरी परतले. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांचे होणारे तब्बल १५ लाखांचे नुकसान टळले. राणे कुटुंबाला कोकणचा स्वाभिमान म्हणून का ओळखले जाते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles