वेंगुर्ला : पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या व खाणकामासाठी प्रसिद्ध असलेल्या अश्या रेडी हुडा ते श्री देवी माऊली मंदिर या रेडीतील मुख्य रस्त्याला डांबरीकरण करते वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने साईडपट्टी केलीच नव्हती. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूची साईड पट्टी खूप खोल झाल्याने ती वाहतुकीस धोकादायक झाली होती व वाहतूक कोंडीच्या समस्येचा व अपघातांचा देखील सामना नागरिकांना करावा लागत होता. रेडीतील काही स्थानिकांनी याबाबत रेडी ग्रामपंचायती कडे लेखी निवेदन, तसेच ग्रामसभेच्या माध्यमातून सातत्याने मागणी करून ही साईड पट्टी घालण्याची विनंती केलेली होती. याच ग्रामस्थांच्या व माऊली युवा प्रतिष्ठान ह्या सामाजिक संस्थेच्या विनंतीचा गांभीर्याने विचार करून सन्माननीय सरपंच,नवनिर्वाचित उपसरपंच,रेडी ग्रामपंचायत यांनी ही साईड पट्टी सुस्थित करण्याचे आश्वासन दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापूर्वी करण्याचे आश्वासन मागील ग्रामसभेत दिले होते, त्याचप्रमाणे हे काम २६ जानेवारी पूर्वी केल्याने त्याच्या या कर्तव्य तत्पर कामासाठी मनापासून आभार मानले.
माऊली युवा प्रतिष्ठान व रेडी ग्रामस्थांची मागणी साईड पट्टी ची होती. तांत्रिकदृष्ट्या बोल्डर घालून रोड रोलर ने घट्ट बसवून वर मुरूम माती टाकून त्यावर रोलर आवश्यक ह्या कामात आवश्यक होते. मात्र रेडी ग्रामपंचायत कडून ही साईड पट्टी ग्रामपंचायत स्तरावर केली गेली असल्याने आणि त्याच्याकडे निधी व रोड रोलर ही साधने उपलब्ध नसल्याने समाधान कारक साईड पट्टी झाली नाही .मात्र तरीही खूपच खोलगट झालेली साईड पट्टी आता काही प्रमाणात का होईना चांगली झाली आहे. रेडी ग्रामपंचायतीने केलेल्या या कामासाठी त्याचे अभिनंदन केले..
ही साईड पट्टी करा यासाठी माऊली युवा प्रतिष्ठानने सातत्याने पाठपुरावा केला कारण काही ठिकाणी साईड पट्टी खूपच खचल्याने वाहतुकीस खूप अडचणी येत होत्या व पर्यटकांच्या अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते, जे धोकादायक ही होते. तसेच रस्त्याच्या बाजूला जागाच नसल्याने ऐन सणासुदीच्या व जत्रोत्सव काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना देखील पर्यटकांना करावा लागत होता, त्यामुळे ही मागणी वारंवार ग्रामसभा व लेखी स्वरूपात देखील लावून धरली जात होती. ती थोडी थोडकी का असेना पण आता सर्वांच्याच लक्षात आले आहे की साईड पट्टी चांगली असणे हे खूपच आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काळात हा रस्ता साईडपट्टी व सूचना फलकांसह चांगल्या दर्जाचा बनवावा यासाठीची आमची मागणी असेल असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आम्ही माऊली युवा प्रतिष्ठानच्या वतीने लवकरच या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी तसेच आपले नूतन पालकमंत्री सन्माननीय श्री. नितेशजी राणे साहेबांना यासंदर्भात लेखी निवेदन देवून रेडीच्या या मुख्य रस्त्याला पुरेसा निधी मंजूर करून देण्याची मागणी करणार आहोत. रेडी मधील इतरही सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत यांनी देखील या संदर्भात मागणी करून लवकरात लवकर रेडीचा हा मुख्य रस्ता दर्जेदार बनविण्यासाठी प्रयत्न करूया व सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास लवकरच हे काम मंजूर होवून एक चांगला मुख्य रस्ता रेडीला मिळेल व स्थानिक तसेच बाहेरून येणाऱ्या भक्तगण व पर्यटकांचा रेडीतील प्रवास सुखकर होईल ,असे आवाहन माऊली युवा प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश रेडकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
माऊली मंदिर ते हुडावाडी मुख्य रस्त्याच्या साईड पट्टीचे झाले काम! ; रेडी ग्रामपंचायतचे माऊली युवा प्रतिष्ठानने मानले आभार.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


