Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

शिवराज्य प्रतिष्ठानतर्फे हळदी कुंकू उत्साहात साजरा!

म्हापुसा (गोवा) :  रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी पालये येथे श्री सातेरी पालेयेकरीन सभागृहात शिवराज्य प्रतिष्ठान गोवा तथा जगत जननी तर्फे सामूहिक हळदी कुंकू साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद गोवेकर,सौ प्रिया प्रेमेन्द्र शेट, श्री दत्त पद्मनाभ पिठाच्या संचालिका सौ नीलिमा तुळशीदास मंद्रेकर, जगत जननी सचिवा सौ सिद्धी सच्चिदानंद मळीक, श्रीराम सेल्फ हेल्प ग्रुप तथा शिवराज्य प्रतिष्ठान खजिनदार सौ सुजया सविदास नाईक उपस्थित होत्या.

शिवराज्य प्रतिष्ठानतर्फे चालवल्या जाणाऱ्या बाल संस्कार वर्गाच्या मुलानी दिनचर्येचे प्रात्यक्षिक सादरिकारण केले यामध्ये सकाळची प्रार्थना, करदर्शन भूमी वंदना तुळशी मंत्र, दुपारचा भोजन मंत्र संध्याकाळची धुपारती, झोपण्यापूर्वी म्हणण्याचा मंत्र, तसेच हिंदू संस्कृती प्रमाणे वाढदिवस गीत गाऊन, आरती ओवाळून, श्री मिलिंद चोडणकर व मिहीर नाईक यांचा वाढदिवस साजरा केला. स्वारगंधार संस्थेच्या तसेच आरोही चोडणकर अद्विता मडगावकर या मुलीनी नृत्य सादरीकरण केले,सौ प्रिया शेट या आपल्या भाषणात म्हणाल्या की लहान मुलांना संस्कार देण्याची आज अत्यंत गरज आहे. आम्ही आमचि संस्कृती सांभाळली पाहिजे. सौ नीलिमा माद्रेकर म्हणाल्या शिवराज प्रतिष्ठानचे कार्य हे खूप चांगले आहे, आपण संस्कारांची देवाण-घेवण केली पाहिजे . सर्व उपस्थित माता-भगिनींना वाण देऊन हळदीकुंकू साजरा केला. सूत्रसंचालन सौ उज्वला मिलिंद चोडणकर व आभार प्रदर्शन श्री सविदास नाईक यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तसेच पत्रकार चंदू मांद्रेकर यांचाही शिवराज्य प्रतिष्ठान तर्फे सन्मान करण्यात आला, कार्यक्रमाला सुमारे अडीचशे माता भगिनी उपस्थित होत्या, अल्पआहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles