Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या पुरस्कारांचे शानदार वितरण.! ; संदीप परब यांचा ‘तात्यासाहेब पोकळे स्मृती समाजभूषण’ पुरस्काराने गौरव.

सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे शिक्षण संस्था ही जिल्ह्यातील चांगली संस्था असून जिल्ह्यात उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तिंना समाजभूषण पुरस्कार तसेच उपक्रमशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला प्रेरणा देणारी संस्था आहे,” असे उद्गार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व माजी आमदार शिवराम दळवी यांनी नेमळे हायस्कूलमध्ये आयोजित वार्षिक पारितोषिक व पुरस्कार वितरण सोहळ्यात काढले.

संविता आश्रमचे संदीप परब हे पुण्यकर्म करतात. या कार्यात सह‌भाग घेऊन त्यांना आर्थिक सहकार्य कसे करता येईल?, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, संदीप परब हे निःस्वार्थी व्यक्तिमत्व आहेत. म्हणून त्यांना समाजभूषण पुरस्कार दिला, असे उद्गार संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांनी काढले.

संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी माजी आमदार शिवराम दळवी यांच्या हस्ते कै. तात्यासाहेब पोकळे स्मृती आदर्श समाजभूषण पुरस्कार जीवन आनंद संस्थेचे संस्थापक व संविता आश्रम प्रमुख संदीप परब यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना संदीप परब म्हणाले,” आमच्या आश्रमात एकूण ३७२ बांधव असून एक लहान बाळ देखील आहे. येथील २२ मुलांना वाढवले व ते बी. एस्सी. झाले आहेत. तसेच या आश्रमातील ४ थी ते ५ वीचे वि‌द्यार्थी सकाळी लवकर उठून अभ्यास करतात. अनेक दानशूर देणगी देतात. त्याच्यातून आश्रम चालवतो. माझे कार्य पाहू‌न संस्थेने मला आदर्श समाजभूषण पुरस्कार देऊन मला गौरविले त्याबद्‌दल संस्थेचा मी ऋ‌णी आहे, असेही परब म्हणाले.

कै. ज.भा. पेंढारकर आदर्श शिक्षक पुरस्कार पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक वि‌द्यालय, पेंढरी येथील सत्यपाल लाडगावकर यांनी माजी आमदार शिवराम दळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच कै. प्रमिला जाधव स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार माध्यमिक वि‌द्यालय, बिळवस येथील अनुष्का कदम यांना प्राचार्या कल्पना बोवलेकर यांच्या हस्ते प्रदान केला.

पाचवी ते बारावीतील यशप्राप्त वि‌द्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला उपाध्यक्ष हेमंत भगत, रमाकांत प्रभूतेंडोलकर, उपसरपंच सखाराम राऊळ, तुकाराम गुडेकर, मदन राऊळ, परशुराम राऊक, राजन मडवळ, महादेव रेडकर, राम राठोड व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्या कल्पना बोवलेकर यांनी केले. अहवाल वाचन राजेश गुडेकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले. उपस्थितांचे आभार लवू जाधव यांनी मानले.

 

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles