महावितरणाच्या कुडाळ येथील अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयावर १० फेब्रुवारी रोजी विराट धडक मोर्चा! ; वीज  ग्राहक संघर्ष समिती, महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हयाच्या वतीने आयोजन. 

सावंतवाडी : महावितरण ऐवजी अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर बसविण्याच्या शासनाच्या धोरणाच्या विरोधात वीज ग्राहक संघर्ष समिती, महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेने सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्ह्याच्या महावितरणाच्या कुडाळ येथील अधीक्षक अभियंताच्या कार्यालयावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांचा विराट धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. या संदर्भात वीज ग्राहक संघटना संघर्ष समिती, महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

यावेळी वीज ग्राहक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे मुख्य निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई, राजेंद्र कांबळे, दीपक जाधव, महेश पेडणेकर, वीरेश ठाकूर, जावेद शहा, मंगेश तळवणेकर, मायकेल डिसोजा, शब्बीर मणियार, रवींद्र म्हापसेकर, संतोष तावडे व अन्य वीज ग्राहक संघर्ष समितीचे पदाधिकारी व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या मोर्चाची सुरुवात 10 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता गांधी चौक कुडाळ येथून होईल. तरी समस्त वीज ग्राहकांनी व सामान्य नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन आयोजक वीज ग्राहक संघर्ष समिती, महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), श्रमिक मुक्ती दल, सत्यशोधक जनआंदोलन, वंचित बहुजन आघाडी, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सत्यशोधक सेक्युलर फ्रंट, सामाजिक एकता मंच, अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र, आशा वर्कस युनियन, विठ्ठल रुक्मिणी शेतकरी संघटना, वन हक्क संघर्ष समिती सिंधुदुर्ग, घरेलू कामगार संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles