Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनधिकृतपणे सुरू असलेली बॉक्साईटची जोरदार वाहतूक कुणामुळे?, महसूल, खनीकर्म विभाग गप्प का? ; मळेवाड जि. प. युवासेना विभागप्रमुख विनायक उर्फ नील प्रभूझांट्ये यांचा सवाल.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्या अनेक ठिकाणी बॉक्साईटची अनधिकृतपणे जोरदार वाहतूक सुरू आहे. महसूल विभाग आणि खनीकर्म विभाग मात्र चक्क मूग गिळून गप्प दिसत आहेट, असा खळबळजनक आरोप मळेवाड जि. प. युवासेना विभागप्रमुख विनायक उर्फ नील प्रभूझांट्ये यांनी केला आहे.

शासनाला गौण खनिजमधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. गौणखनिज व्यवसाय करणारे हे पूर्णपणे कायदेशीर उत्खनन करतात असे नाही.शासनाने त्यांना मंजूर केलेल्या परवान्या पेक्षा जास्त उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवून आपला स्वतःचा फायदा करून घेतात. हे सर्व होतं ते महसूल आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे. शासनाकडून अधिकाऱ्यांना फार मोठे पगार देउन सर्व सुख सोयी दिल्या जातात जेणेकरुन त्यांना कोणतीही कमतरता भासू नये. मात्र तरीही काही अधिकाऱ्यांची पैशाची भूक काही थांबत नाही आणि अशा अवैध वाहतूक करणाऱ्या व उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांशी संगनमत करून तोडपाणी करतात. चिरेखणीतील तुटलेले दगड (फुटके) हे जेसीबी ब्रेकरच्या साह्याने फोडून त्याचे छोटे छोटे तुकडे करून ते डंप मध्ये भरले जातात.

सध्या मळेवाड, साटेली, सातार्डामार्गे गोवा अशी बॉक्साईट सदृश्य दगडांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात चिरेखाणीतून बॉक्साईट सदृश्य दगडाची डंपरमधून गोव्याच्या दिशेने रात्रीच्या वेळी वाहतूक होते. मात्र आता दिवसाढवळ्या वाहतूक होते. असे असताना महसूल अधिकारी आणि खणी कर्म विभाग मात्र चक्क डोळे झाकून बघ्याच्या भूमिकेत का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. बॉक्साईट सदृश्य वाहतूक करताना त्यांच्याकडे कोणताही परवाना नसतो मात्र काही बोगस पासची जुळवाजुळव करून ही वाहतूक करणारं रॅकेट सक्रिय आहे. या रॅकेटचा लवकरच पर्दापाश करून मुजोर व्यावसायिक महसूल यंत्रणा कशी स्वस्त आहे?, हे समोर आणले जाणार आहे, असे देखील नील प्रभूझांट्ये यांनी सांगितले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles