पिंपरी चिंचवड: निगडी प्राधिकरणस्थित पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओई) मध्ये भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे “पंतप्रधान इंटर्नशिप योजना” संबंधित माहितीसत्राचे आयोजन 11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 09:00 वाजता ‘पीसीईटी ऑडिटोरियम’ निगडी येथे करण्यात आले आहे. या माहितीसत्रात भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आयसीएलएस विभागाचे अधिकारी या योजनेची संपूर्ण माहिती देणार आहेत. तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची व गेल्या तीन वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या योजनेत ऑनलाईन नोंदणी देखील करून घेण्यात येणार आहे.
“पंतप्रधान इंटर्नशिप योजना” ही भारत सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 24 वयोगटातील तरुणांना देशातील सुमारे 500 अग्रगण्य कंपन्यांमध्ये सुमारे 1 कोटी इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होणार असून इंटर्नना दरमहा स्टायपेंड देखील दिले जाणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश तरुणांना उद्योग क्षेत्रात लागणाऱ्या कौशल्यांनी सुसज्य करून नोकरीसाठी तयार करणे व त्यांच्या करिअरला चालना देणे हा आहे.
अभियांत्रिकी / विज्ञान / कला / वाणिज्य / बीसीए / बीसीएस / व्यवस्थापनशास्त्र ईत्यादी शाखेतील (उत्तीर्ण झालेले किंवा अंतिम वर्षातील) पदवीधर / पदविकाधारक (डिप्लोमा) / आयटीआय / बारावी उत्तीर्ण / दहावी उत्तीर्ण विद्यार्थींनी या माहितीसत्रात सहभागी होऊन “पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा” लाभ घ्यावा असे आवाहन पीसीईटीच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी केले आहे.
या माहितीसत्रात सहभागी होण्याकरिता खालील लिंक वर रजिस्ट्रेशन करावे :
https://tinyurl.com/PMinternship22
सदर कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता पीसीईटीचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव श्री. विठ्ठल काळभोर, खजिनदार श्री. शांताराम गराडे, विश्वस्थ श्री. हर्षवर्धन पाटील, उद्योजक श्री. नरेंद्र लांडगे, श्री. अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई व प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे, असे श्री. डॉ. शीतलकुमार रवंदळे, अधिष्ठाता – सेंट्रल प्लेसमेंट सेल, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी), पुणे यांनी कळविले आहे.
अधिक महितीसाठी –
मोबाईल : 9975490622
ईमेल : s.rawandale@gmail.com


