Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

योग्य सुविधेसह भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य! : पालकमंत्री नितेश राणे. ; आंगणेवाडी नियोजन बैठक संपन्न.

सिंधुदुर्गनगरी :  लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी यात्रेला अनेक ठिकाणाहून भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना आरोग्य, स्वच्छता अशा पायाभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. यात्राकाळात भाविकांना आवश्यक सोयी-सुविधेसह पोलीस प्रशासनाने सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मालवण तालुक्‍यातील आंगणेवाडी येथील श्री. भराडी देवी वार्षिक जत्रौत्‍सव नियोजनाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, मालवण तहसिलदार वर्षा झाल्टे, कुडाळ तहसिलदार विरसिंग वसावे, आंगणेवाडी विश्वस्त तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले अंगणेवडी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. यात्रेदरम्यान भाविकांना सर्व पायाभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. यात्राकाळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.गर्दीच्या ठिकाणी अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात करावा. आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम असावी. येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता अधिकच्या वैद्यकीय पथकांची नेमणूक करावी, शक्य असल्यास यात्रा कालावधीत खाजगी डॉक्टर्स नेमून त्यांच्या सेवा उपलब्ध करून घ्याव्यात. औषधे व सुविधा असलेल्‍या रुग्‍णवाहिका वैद्यकिय पथकाकडून सुसज्ज ठेवाव्यात, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय पथक, अतिरिक्त डॉक्टर, बेड रुग्णवाहिका यांची व्यवस्था करावी. यात्रा कालावधीत आणि यात्रेनंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. साफसफाईसाठी नगरपालिकेने आणि देवस्थान समितीने कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत. पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पुरेशा प्रमाणात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. एमएससीबीने अधिकची दक्षता घ्यावी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नियोजन करून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. मंदिर परिसरात सीसीटीव्ही लावावेत जेणेकरून अनुचित प्रकार घडणार नाही. एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार नाही याची दक्षात घेऊन ठराविक अंतर निश्चित करुन दुकानांना परवानगी देण्यात यावी. भाविकांना सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles