कुडाळ : कुडाळ एम. आय. डी. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाचा उद्योग भरारी हा उत्कृष्ट उद्योजक म्हणून पुरस्कार मिळालेले कुडाळ औद्योगिक वसाहतीतील उद्योजक कौसर खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी कौसर खान यांचा शासनाच्या वतीने पुरस्कार मिळाला म्हणून असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कौसर खान हे छोट्या मोठ्या उद्योजकांसाठी व प्रक्रिया उद्योगासाठी मशीन पुरवतात. १९८८ पासून त्यांनी या उद्योगाला सुरूवात केली. प्रचंड मेहनत आणि सातत्य यामुळे त्यानी हे यश मिळवलेले आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कुडाळ औद्योगिक वसाहतीतील सगळ्यात जेष्ठ व यशस्वी उद्योजक तसेच असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री कमलाकांत परब यांना असोसिएशनच्या वतीने उद्योग गुरू हा पुरस्कार देऊन असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे कार्यवाह अॅड नकुल पार्सेकर यांनी केले. आपल्या समारोपाच्या संबोधतनात अध्यक्ष श्री मोहन होडावडेकर यांनी असोसिएशनच्या वतीने मार्गी लावल्या समस्या व भविष्यातील नियोजनाबाबत माहिती दिली. आभार उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर यांनी मांडले तर सुञसंचालन असोसिएशनचे सल्लागार श्री हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांनी केले. कार्यक्रमाला असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, उद्योजक बहुसंख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन- उद्योजक खान यांचा सत्कार करताना उपाध्यक्ष डॉ. पावसकर सोबत कमलाकांत परब, अध्यक्ष मोहन होडावडेकर, कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर व हरिश्चंद्र वेंगुर्लेकर
कुडाळ ‘MIDC’ इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. ; ध्वजारोहण उद्योजक कौसर खान यांच्या हस्ते संपन्न.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


