सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानच्या राजकुमारी उर्वशी व संदीप बोथीरेड्डी यांच्या विवाहाप्रित्यर्थ राजवाडा येथे स्वागत समारंभाच आयोजन करण्यात आले होते. याला महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, उद्योजक श्री. अजय दोडिया, सौ.जयश्री दोडिया, श्री. प्रभाकर बोथीरेड्डी, सौ. जयश्री बोथीरेड्डी आदी उपस्थित होते.