कणकवली : मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रयागराज येथे आई सौ.नीलमताई राणे यांच्यासह महा कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले.

याबाबत मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक्स वर तशी पोस्टही केले आहे. त्यात ते म्हणतात,”आज प्रयागराज येथे कुटुंबासह महाकुंभात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याचे परम सौभाग्य प्राप्त झाले. हा माझ्या आयुष्यातील त्या मौल्यवान आणि भावनिक क्षणा पैकी एक क्षण आहे, हिंदू संस्कृती, परंपरा आणि आई प्रती असलेल्या भक्तीचे जीवन प्रतीक म्हणून हा भावनिक क्षण माझ्या हृदयात नेहमीच कोरला जाईल. गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमात स्नान करून सनातन धर्माच्या गौरवशाली परंपरेचा अनुभव यावेळी घेतला.” असे त्यांनी म्हटले आहे.
ADVT –


सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


