व्ही. एन. नाबर स्कूल, मडूराचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!

सावंतवाडी : तालुक्यातील मडूरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरीयल इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. नकुल पार्सेकर, ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई, यांच्यासह स्थानिक कमिटीचे अध्यक्ष भिकाजी धुरी, संस्था पदाधिकारी त्रीविक्रम उपाध्ये, श्री. पारकर, बांदा येथील संस्थेच्या शाळेच्या प्राचार्य मनाली देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी अ‍ॅड. पार्सेकर यांनी या शाळेच्या कार्याचे कौतुक केले. संस्था करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत स्थानिक पातळीवरून आणखी सहकार्य मिळावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. श्री. देसाई यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिक्षा शिरोडकर, सौ. देसाई यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पालक संघाचे पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी आदि उपस्थित होते.

 

ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles