सावंतवाडी : तालुक्यातील कोलगाव कुंभारवाडी येथील संत शिरोमणी गोरा कुंभार सेवा मंडळ ही संस्था अत्यंत आदर्श कार्य करीत असून समाजाला अशा तळमळीच्या कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे. महाराष्ट्रात आपल्या त्यागमय कार्यातून श्री संत गोरा कुंभार सेवा मंडळाच्या कोलगाव येथील बांधवांनी विधायक संदेश दिला आहे. त्याचा समाज बांधव म्हणून मला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार कोकण विभाग कुंभार सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशाचे कोकण अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी कोलगाव येथे काढले. श्री संत शिरोमणी गोरा कुंभार यांच्या जयंतीनिमित्त संत गोरोबा काकांचे कोलगाव कुंभारवाडी येथील मंदिराच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन व कलशारोहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुंभार सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस विलास गुडेकर, संपर्क प्रमुख ॲड. प्रा. गणपत शिरोडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, कुंभार संघटना जिल्हाध्यक्ष नारायण साळवी, उपाध्यक्ष यशवंत शेदुलकर, दिलीप हिंदळेकर, विष्णू माणगावकर, माजी पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर तसेच चिपळूण येथील पतसंस्थेचे चेअरमन तुकाराम साळवी, संचालक प्रमोद निवडकर, संचालक तुकाराम साळवी, युवा कार्यकर्ते महेश साळवी, कोलगाव ग्रामपंचायत सदस्य सौ. पूनम उगवेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष एकनाथ कुंभार, चंदन धुरी, काशिनाथ तेंडुलकर तसेच श्री संत गोरा कुंभार सेवा मंडळ, कोलगाव कुंभारवाडीचे अध्यक्ष गणेश उर्फ बाळा हरमलकर, संदीप गवस, प्रकाश सावंत, आदी उपस्थित होते.
सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मंदिराच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी बोलताना संपर्कप्रमुख प्रा. गणपत शिरोडकर यांनी सांगितले, कोलगाव कुंभारवाडी येथे संत शिरोमणी गोरा काकांचे मंदिर व्हावे, अशी माझी अनेक दिवसांपासून इच्छा होती. ती इच्छा बाळा हरमलकर यांच्या पुढाकाराने व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या त्यागाने आज पूर्ण झाली आहे, याचा अत्यंत आनंद व अभिमान असून कोलगाव कुंभारवाडीतील समाज बांधवांनी जो एकोपा दाखवलाय त्याला माझा सलाम आहे, असेही कौतुकही प्रा. शिरोडकर यांनी केले. यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा मनाली की म्हणाले की कोलगाव कुंभारवाडी येथील कुंभार समाजातील बांधवांनी नेहमीच संयम दाखवून तसेच एकोप्याने कार्य करून आपल्या वागण्याने आदर्श नागरिक कसा असावा?, याचे दर्शन घडविले आहे. माझे स्वर्गीय वडील फ्रान्सिस डिसोजा यांच्यावर नितांत श्रद्धा व प्रेम असलेल्या या कुंभारवाडीतील बांधवांचा मला प्रचंड अभिमान असल्याचेही डिसोजा यांनी सांगितले.
यावेळी राज्य सरचिटणीस विलास गुडेकर म्हणाले, संत शिरोमणी गोरा कुंभार मंदिराच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन करताना मनस्वी आनंद झाला आहे. यापुढे समाज बांधवांना काहीही मदत लागली तरी त्यासाठी आपण पुढाकार घेणार असून आर्थिक स्वरूपाची देणगीही त्यांनी जाहीर केली.
दरम्यान या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष गणेश हरमलकर यांनी केले तर अनोख्या शैलीत बहारदार सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन ललित हरमलकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत शिरोमणी गोरा कुंभार मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संयोजन गणेश हरमलकर, ललित हरमलकर, राजा कुडाळकर, चंद्रकांत कुडाळकर, गौरव कुडाळकर, कृष्णा हरमलकर, बुधाजी हरमलकर, सचिन पिकुळकर, दीपक कुंभार, सूरज कुडाळकर, आदींनी केले.
दरम्यान दिवसभर चाललेल्या श्री संत शिरोमणी गोरा कुंभार जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध विधी संपन्न झाल्या. यात सकाळी प्रकार शुद्धी व नवग्रह होम, कलशारोहण समारंभ, दुपारी आरती व तीर्थप्रसाद. तसेच रात्री नऊ वाजता वृंदावन संगीत साधना ग्रुप, पिंगुळी (कुडाळ) यांचा अभंग, भक्ती गीते व नाट्यगीते गायनाचा बहारदार कार्यक्रमही संपन्न झाला.
ADVT –
सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.