सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी श्री. वामन तर्फे यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी रवींद्र सावंत, हनुमंत वाळके, कार्यवाह रामचंद्र घावरे, सहकार्यवाह प्रशांत सावंत, विध्यासमिती अध्यक्ष रत्नाकर सरवणकर, विद्या समिती सचिव राजेंद्र राठोड ,आयव्यय निरीक्षक जयवंत ठाकूर यांची निवड करण्यात आली. तर कौन्सिल सदस्य म्हणून शमशुद्दीन अत्तार,संजय खोचरे (देवगड) जयदीप सुतार,(वैभववाडी), सुशांत पाटील (मालवण), विष्णू वगरे (कणकवली), दशरथ काळे, नारायण कोठावळे (कुडाळ), जे. आर. पाटील, चौरे, तेरसे (सावंतवाडी), महेंद्र देसाई, नंदकुमार नाईक (दोडामार्ग), देवानंद चव्हाण (वेंगुर्ले), सौ. रसिका राजेंद्र गोसावी (मालवण) यांची निवड करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची सर्वसाधारण सभा कुडाळ येथिल महालक्ष्मी हाॅल येथे अध्यक्ष श्री वामण तर्फे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी कार्यवाह गुरुदास कुसगांवकर,उपाध्यक्ष रामचंद्र घावरे, हनुमंत वाळके, रवींद्र सावंत, अजित परब आदी उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेत ६ कार्यकारिणी सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली तर दोन उपाध्यक्ष पदासाठी तीन अर्ज दाखल करण्यात आल्याने मतदान घेण्यात आले. यामध्ये हनुमंत वाळके व रवींद्र सावंत हे विजयी झाले. सदर कार्यकारिणी दोन वर्षांची आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शमशुद्दीन अत्तार व प्रेमचंद राठोड यांनी काम पाहिले.
ADVT –


सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


