आजगाव : लोककल्याण शिक्षण संस्था संचलित, विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगाव या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक कै. गुरुवर्य रा. गो. सामंत यांच्या ३२ व्या स्मृतिदिन प्रित्यर्थ जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातून विद्यार्थ्याने उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव,या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक कै.गुरुवर्य रा. गो. सामंत सरांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय देशभक्ती समूहगीत स्पर्धा आयोजित केली होती.

या स्पर्धेचा शुभारंभ दीपप्रज्वलन करून तसेच कै. गुरुवर्य सामंत सरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी स्वागत गीत सादर करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शाळा समिती अध्यक्ष श्री .रामचंद्र (अण्णा) झांट्ये, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष बाबाजी गोवेकर, माजी केंद्रप्रमुख श्री. विलासानंद मठकर, माजी विद्यार्थी योगेश मंत्री, श्री मुळीक, परीक्षक संगीत विशारद कु. ममता दत्ताप्रसाद प्रभू, डी. एड. कॉलेजच्या प्रा. प्रतिभा चव्हाण आदि उपस्थित होते.

प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी प्रस्तावना केली तर शाळा समिती अध्यक्ष अण्णा झांट्ये यांनी कै. गुरुवर्य सामंत सरांच्या आठवणी जागवत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. परीक्षक तथा शाळेच्या माजी विद्यार्थीनी संगीत विशारद कु. ममता प्रभू यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेत एकापेक्षा एक अशी सरस देशभक्तीपर समूहगीते सादर करण्यात आली. सर्वच स्पर्धकांनी उपस्थितांची वाहवा मिळविली.

स्पर्धेतील विजेते संघ –
प्रथम क्रमांक – जिल्हा परिषद केंद्र शाळा आजगाव नंबर १, द्वितीय क्रमांक श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव. तृतीय क्रमांक – आरोंदा हायस्कूल,आरोंदा तर उत्तेजनार्थ स्टेफिन स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी.
यावेळी आरोंदा हायस्कूलचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे, चंदन गोसावी, आरोस हायस्कूलचे मोहन पालेकर, शिक्षक दत्तगुरु कांबळी, पत्रकार मदन मुरकर, पालक प्रतिनिधी दिव्या काळोजी उपस्थित होते.
कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संघाने सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका काव्या साळवी तर आभार मानसी परुळेकर यांनी मानले.
ADVT –




