मळगाव इंग्लिश स्कूलमध्ये ‘माय मराठी’चा जागर.! ; ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा.

सावंतवाडी : दिनांक २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिन. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस अर्थात ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचं मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या प्रशालेमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्सवात सादरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ , संस्था कार्याध्यक्ष श्री. नंदकिशोर राऊळ, स्कूल कमिटी सदस्य श्री.दीपक जोशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी पुंडलिक ठाकरे, मुख्याध्यापक श्री.फाले , पर्यवेक्षक श्री.कदम तसेचं शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून विविध कविता, वेडात मराठे वीर दौडले सात हे समुहगीत, गोष्टी तसेच चित्रपट सृष्टीचा इतिहास सांगणारे नृत्य सादर करण्यात आले आदी शालेय उपक्रम घेण्यात आले.
तसेच प्रशालेचे सहा. शिक्षक श्री.तिवरेकर , श्री.कारिवडेकर ,श्री.बी.बी.सावंत, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणे केली.तसेच प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका सौ. प्रज्ञा मातोंडकर व ऋतुजा सावंतभोसले मॅडम यांनीही आपल्या स्वरचित कविता सादर केल्या.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे सहाय्यक शिक्षिका सौ. प्रज्ञा मातोंडकर, सौ. नेहा गोसावी, ग्रंथपाल श्री सतीश राऊळ, श्री अभिषेक गावडे तसेच श्री. रीतेश राऊळ व इयत्ता आठवीच्या व पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली व हा कार्यक्रम यशस्वी पार पडला

ADVT –

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles