सावंतवाडी : श्री जाणता राजा प्रतिष्ठान, नेमळे यांच्या सौजन्याने उद्या गुरुवार दि. 6 मार्च रोजी रात्रौ ठीक 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव छत्रपती श्रीमंत संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट विनामूल्य मोठया पडद्यावर स्थळ नेमळे देऊळवाडी येथे सातेरी मंदिर समोर, शिव स्मारकाच्या बाजूला दाखविण्यात येणार आहे. तरी सर्व शिव प्रेमी तसेच सर्व छत्रपती संभाजी महाराज यांच्या भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जाणता राजा प्रतिष्ठान मंडळ नेमळेच्या वतीने करण्यात आले आहे.
ADVT –




