सावंतवाडी : गोवा बांबोळी येथील रुग्णाला बायपास सर्जरी दरम्यान ‘बी पॉझिटिव्ह’ या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यकता होती. यावेळी युवा रक्तदात्यांनी रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. यामुळे रूग्णाला जीवदान मिळाले आहे.
सावंतवाडी येथून मयूर गावडे, प्रथमेश सुकी, तौसिफ शेख, शुभम धारगळकर या युवा रक्तदात्यांनी गोवा बांबोळी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी विशेष परिश्रम घेतले. तातडीने गोवा येथे जाऊन रक्तदान करत रूग्णाला जीवदान दिल्याबद्दल श्री. सुर्याजी यांनी रक्तदात्तांचे आभार मानले आहेत.
ADVT –