Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

प्रतिष्ठित गुन्हेगारीसाठी ‘जामीन’ हाच जालीम उपाय.! – ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. ह. ना. जगताप यांचे ‘चिंतन’.

वाचक मित्रहो, एखादे असामाजिक कृत्य किंवा एखादा गुन्हा करून पैसा, प्रतिष्ठा मिळवायची असेल , किंवा कोणाचा बदला घ्यावयाचा असेल तर अलिकडे एक चांगली सोय न्यायालयाने उपलब्ध करून दिलेली आहे.
एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केला व पोलीसांनी त्याला कोर्टासमोर हजर केले की, कोर्ट त्याला जामीन मंजूर करते. मग तो गुन्हा कितीही गंभीर स्वरूपाचा असो . खालच्या कोर्टांनी जामीन देण्यात कसूर करू नये असे सर्वोच्च न्यायालयाचा देखील दृष्टीकोन असावा असे वाटते . शिक्षाही अपवादात्मक असावी अशी एकूण सर्व स्तरावरील न्यायालयाची भूमिका दिसते.

आता या जामीन प्रकरणामुळे काय होवू शकते याकडे कोर्टाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते . गेल्यावर्षी जामीन मिळालेल्या व्यक्तीने आपल्यावर केस केलेल्या व्यक्तीचा खून केला. बरे , जामीन मिळालेल्या व्यक्ती हल्ली अगदी आपण काही केलेच नाही किंवा आपण निरपराध आहोत व आपल्यावर उगीच कोणीतरी बालंट आणलेले आहे असे बिनदिक्कत सांगतात . जामीनावर सुटलेली व्यक्ती जणूकाही निर्दोष आहे असे त्यांच्या चाहत्यांना किंवा सहकाऱ्यांना वाटू लागले आहे . एवढेच नव्हे तर त्यावर शासनापासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वजण डोळे झाकून विश्वास ठेवतात किंवा त्यांच्या गुन्ह्याकडे डोळेझाक करतात .
त्यामुळेच जामीन मिळालेल्या व्यक्ती सरपंच , नगरसेवक , आमदार, होतात इतेकच काय त्यांना मंत्रीपद देखील मिळते . तर काही मंत्री गुन्हे करून जामीनावर सुटून पुन्हा निवडून येतात . आता तर माझ्यावर इतक्या केसेस आहेत हे अभिमानाने सांगितले जाते . कित्येकांना तर इतके दिवस जामीन मिळतो की, ते
जामीनातच मरण पावतात. तर काहीजण जामीनावर असून देखील छोटे मोठे गुन्हे करीत राहतात . जनता देखील त्यांना मोठ्या मनाने माफ करते . इतकेच काय परंतु मागच्याच महिन्यात कोल्हापूर व पुणे येथे दोन कुख्यात गुन्हेगार जामीनावर बाहेर आल्यावर त्यांच्या मोठ्या मिरवणुका काढण्यात आल्या . हे राजकारण्यांच्या बाबतीत तर नेहमीचीच बाब झाली आहे.

बरे , हे बोलायची चोरी कारण न्यायालयाची बेअदबी होईल की काय अशी सर्वसामान्य तुम्हा आम्हाला भीती वाटत राहते . १०० अपराधी सुटले तरी चालतील परंतु कोणा एकावरही अन्याय होवू नये या सद्भावनेतून न्यायालय जामीन देत असावे परंतु गुन्हेगार मात्र याचा पुरेपूर गैरफायदा घेवून उजळ माथ्याने फिरताहेत . एवढेच नव्हे तर ते गुन्हेगारीला समाजमान्य करीत आहेत . किंबहुना गुन्हेगारी करून पैसा, प्रतिष्ठा मिळविण्याचा त्यांना ‘ जामीन ‘ हा एक जालीम उपाय सापडला आहे असे दिसते..!
       – डॉ. ह. ना. जगताप

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles