Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग अन् सिंधू विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था कुडाळचा उपक्रम कौतुकास्पद.! : माजी मंत्री तथा आम. दीपक केसरकर. ; कमर्शियल व्हेईकल एक्सपोचे सावंतवाडीत आयोजन.

सावंतवाडी : अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग आणि सिंधू विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था कुडाळचा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. अनेक बेरोजगार युवक-युवतींना यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. युवक, महीलांना कर्ज उपलब्ध होऊन स्वतःच वाहन खरेदी करत स्वतःचा व्यवसाय करता येणार आहे. यासाठी आयोजकांचे मानावे तेवढे आभार थोडे आहेत, असे मत माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथील कमर्शियल व्हेईकल एक्सपोचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या आणि सिंधू विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था कुडाळ यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर तीन दिवसीय कमर्शियल व्हेईकल एक्सपो आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री, आम दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आम. दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा सत्कार अखिल भारतीय मराठा महासंघाकडून करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

या एक्स्पोमधून मराठा व ओबीसी व्यावसायिक वाहनधारकांसाठी बिना व्याज व्यावसायिक वाहन खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे व्याज प्रतिपुर्ती योजना लागू केलेली आहे. या योजनेच्या धर्तीवर ओबीसी वर्गाकरीता महाराष्ट्र शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेमधून व्याज प्रतिपुर्ती लाभार्थ्यांना दिली जाते. या दोन्ही योजनांमधून कर्जावरील व्याज हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून जमा केले जाते. याचा अनेकांना लाभ होणार आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री, आम दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष संजू परब, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो ट्रॅक्टर बस वाहतूक महासंघ मुंबईचे अध्यक्ष प्रकाश गवळी, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अँड सुहास सावंत, अभिजीत सावंत, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे, उद्योग व व्यापार अध्यक्ष पुंडलिक दवळी, सोनू गवस, उदय पास्ते,मनोहर येरम, विनय गायकवाड, वैभव जाधव, प्रा.सतिश बागवे, रूजूल पाटणकर, अशोक दळवी, उमाकांत वारंग, अपर्णा कोठावळे, संजय लाड, अखिलेश कोरगावकर, प्रशांत ठाकुर,दिगंबर नाईक,आनंद नाईक, अभिजीत सावंत,बापु राऊळ,शांताराम पारधी आदी उपस्थित होते

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles