Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

आम. दीपक केसरकर यांच्या हस्ते श्री एकमुखी दत्त मंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिरच्या भक्तनिवास व सुशोभीकरण कामाचं भुमिपूजन.!

सावंतवाडी : श्री एकमुखी दत्त मंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनीसवाडा येथे होणाऱ्या भक्तनिवास व सुशोभीकरण कामाचं भुमिपूजन माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झालं. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्याकडून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत भक्तनिवास व सुशोभीकरण काम मंजूर झालं आहे. या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. एकमुखी दत्त मंदिराच्या मागील जागेत ४ कोटी ३४ लाख ९४ हजार रुपये खर्चून भव्यदिव्य असे भक्तनिवास उभं केलं जाणार आहे.

श्री एकमुखी दत्त मंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनीसवाडा येथे होणाऱ्या भक्तनिवास व सुशोभीकरण कामाचं भुमिपूजन माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झालं. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्याकडून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत भक्तनिवास व सुशोभीकरण काम मंजूर झालं आहे. या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. एकमुखी दत्त मंदिराच्या मागील जागेत ४ कोटी ३४ लाख ९४ हजार रुपये खर्चून भव्यदिव्य असे भक्तनिवास उभं केलं जाणार आहे.

मंदिराच्या समोरील उजव्या बाजूच्या जागेत सुसज्ज अन्नपूर्णा इमारत बांधली जाणार आहे. यामध्ये दत्त भक्तांना निवास तसेच योगा हॉल, पुजाऱ्यांना राहण्यासाठी सुसज्ज खोली आदी सुविधा निर्माण केल्या आहेत. भविष्यात दत्तमंदिरच्या भक्तनिवासाच्या माध्यमातून भाविक भक्तगणांची राहण्याची उत्तम सोय होणार आहे. या कामाचे भूमिपूजन माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री दत्तमंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर व्यवस्थापन उपसमिती, सावंतवाडी यांच्याकडून श्री. केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, उपसमितीचे सचिव जितेंद्र पंडीत, खजिनदार सुधीर धुमे, कंत्राटदार म्हाडळकर सन्सचे सचिन गडेकर, वास्तुविशारद मनिष परब, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष अण्णा देसाई, पुरोहित परशुराम कशाळीकर, पराष्टेकर, कमिटी सदस्य दीपक पटेकर, संतोष तळवणेकर, सौ.लतिका सिंग, विनायक पराडकर, गुरुनाथ पराडकर, सौ.तुळसुळकर, विलास सावंत, रिक्षा संघटनेचे सुधीर पराडकर, विश्वास घाग, प्रा.सुभाष गोवेकर, बंटी पुरोहित, गुरुनाथ मठकर, शिल्पा सावंत, बाळा सावंत, संदेश परब, विनोद सावंत, महेश कुमठेकर, अरूण मेस्त्री, भरत गावडे, रणजीत सावंत, साक्षी गवस, डॉ.कांचन विर्नोडकर, रुपाली रेडकर, अक्षता सावंत, ज्योती कदम, अर्चित पोकळे, निखिल सावंत, समिर पालव, आदी भक्तमंडळी, संतोष सावंत, राजू तावडे, विनायक गावस, अभिमन्यू लोंढे, सीताराम गावडे, शैलेश मयेकर, आनंद धोंड आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles