Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

महसूल विभागाच्या आंबोली मंडळातील दोन तलाठी कार्यालयाचे वीज बिल थकीत..! ; महावितरणकडून वीज पुरवठा बंद केल्यास उद्भवणार विविध अडचणी.

सावंतवाडी : महसूलच्या विभागाच्या आंबोली मंडळातील दोन तलाठी कार्यालयांचे तब्बल 37,000/ रुपयेचे वीज बिल थकीत असून विद्युत महामंडळाने वीज पुरवठा बंद केल्यास महसूलच्या आंबोली मंडळातील आंबोली, देवसू, दाणोली, केसरी,  फणसवडे, सातुळी, बावळाट, ओवळीये , पारपोली या गावातील सामान्य नागरिकांना होणार आहे.
महसूल विभागावतीने गौण खनिज वाहतूक व वाळू वाहतूकदारांना नियमानुसार वाळू वाहतूक करण्याचे सल्ले देणारे मंडळ अधिकारी व तलाठी स्वतःच्या कार्यालयाचे दोन दोन वर्षे बिले थकीत ठेवून नेमका कोणता आदर्श निर्माण करतात? हाच प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे. महावितरणने संबंधित कार्यालयांना नोटीस देऊन देखील वीज बिल न भरणाऱे हे महसूलचे कर्मचाऱी आपल्या कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना मात्र विविध कायदे आणि नियम शिकवत असतात. विज बिल भरण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विनंती करून देखील अधिकारी व कर्मचारी त्यांना जुमानत नाहीत‌ या कार्यालयातील बिले थकीत असल्यामुळे महावितरणच्या कंत्राटी पद्धतीच्या वीज कर्मचाऱ्यांचे थकबाकी वसूल होत नाही म्हणून पगार रोखले जातात. मात्र सातवा वेतन आयोग घेणारे हे महसुल विभागाचे चे मंडळ अधिकारी व तलाठी बिल भरण्यासाठी मात्र टाळाटाळ करत आहेत. त्याचा त्रास महावितरणच्या कंत्राटी पद्धतीच्या वायरमन भोगावा लागत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles