संजय पिळणकर.
वेंगुर्ला : येथील उपजिल्हा रूग्णालयात राष्ट्रीय गरोदरपणातील मधुमेह जनजागृती दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलननाने डॉ. सौ. स्वप्नाली पवार, डॉ. संदीप सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी उपस्थीत गरोदर मातांना स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ.सौ.पवार यांनी गरोदरपणातील मधुमेह आजाराविषयी मार्गदर्शन केले.
गरोदरपणातील मधुमेहामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके व त्याविषयी लवकर तपासणी करून उपचार करण्याबाबत मार्गदर्शन केले.यासाठी उपयुक्त असणारी GTT टेस्ट करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी वेंगुर्ला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक व बालरोगतज्ञ डॉ. संदीप सावंत यांनी गरोदर मातांना मधुमेह असल्यास त्यामुळे बालकांना उद्भवणाऱ्या आजारपणाबाबत मार्गदर्शन करताना बालकांची काळजी कशी घ्यावी व संगोपन कसे करावे? याबाबत मार्गदर्शन केले. वेळी कार्यक्रमाला रुग्णालयातील कर्मचारी,आरोग्य सेविका,लाभार्थी गरोदर माता व मधुमेही रुग्ण उपस्थित होते.


