सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची नुकतीच शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटनेने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. यावेळी सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्यासह संपूर्ण युवा रक्तदाता संघटनेने त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, यांच्यासह मेहर पडते, ॲड. प्रथमेश प्रभू, अनिकेत पाटणकर, संकल्प धारगळकर, सूरज मठकर, गौरव कारेकर, देवेश पडते, प्रफुल गोंदावळे, ॲड. प्रसाद नाटेकर, दिग्विजय मुरगोड यांच्यासह युवा रक्तदाता टिम उपस्थित होती.
ADVT –



