सावंतवाडी : येथील इनरव्हील क्लबच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधत येथील कारागृहात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांनी बंदिवान बांधव तसेच कारागृहाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बांधव यांना राख्या बांधल्या. यावेळी मृणालिनी कशाळीकर यांनी बंदिवानांना चांगले जीवन कसे जगावे, चूक माणसाकडूनच होते मात्र ती चूक सुधारून पुढील आयुष्य कसे सुख आणि समृद्धीचे करता येईल, त्यासाठी कोणतं विधायक काम करणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रेसिडेंट सुमेधा धुरी, सेक्रेटरी वैभवी शेवडे, आय. एस. ओ. दर्शना देसाई, एडिटर देवता हावळ, रिया रेडीज, दर्शना रासम,, साधना रेगे, मीनल नाईक, प्रणवी परब, उल्का मॅडम आदी इनरव्हील क्लबचे सदस्य उपस्थित होते.



