सावंतवाडी : आज रक्षाबंधननिमित्त आरोंदा हायस्कूल, आरोंदा येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या तयार करून पर्यावरण रक्षणाचा संदेश समाजाला दिला. इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी विविध रंगीबेरंगी पाने, फुले, वेली यांचा कल्पकतेने उपयोग करून अत्यंत आकर्षक अशा प्रकारच्या राख्या तयार केल्या. सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालाचे पर्यावरण शिक्षक ताराचंद राठोड, प्रशालेच्या शिक्षिका स माजगावकर व कोरगावकर शिक्षक श्री. वसावे, गावडे यांनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतले. प्रत्येक इयत्तेने विविध पद्धतीने राख्यांचे प्रदर्शन करून त्यानंतर वृक्षांना राख्या बांधून ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा पर्यावरणरक्षणाचा संदेश दिला. प्राचार्य सिद्धार्थ तांबे यांचे उपक्रमाला मार्गदर्शन लाभले.