सावंतवाडी : केवळ क्रीडा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम नव्हे तर सामाजिक उपक्रमातून समाज्यात नेहमी अग्रेसर असलेल्या सोनुर्ली येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाने पणदूर संविता आश्रमातील निराधारांसाठी जीवनावश्यक वस्तू भेट देत मराठी नवीन वर्षाची सुरुवात एका सामाजिक उपक्रमातून केली.
कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमामध्ये गेले कित्येक वर्ष संस्थापक संदीप परब हे निराधार बांधवांसाठी सेवा देत आहेत रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी सुरू केलेल्या या आश्रमात आज 180 निराधार आनंददायी जीवन जगत आहेत मनोरुग्ण शरीराने पीडित तसेच दिव्यांग वयोवृद्ध आणि लहान मुले आधी निराधारांची या ठिकाणी नित्यसेवा संदीप परब आणि तेथील कर्मचारी वर्ग करत आहेत. श्री परब यांची ही सेवा लक्षात घेता या कार्यात खारीचा वाटा म्हणून नवयुवक कला क्रीडा मंडळ सोनुर्ली पाक्याचीवाडी यांनी जीवनावश्यक वस्तू आज पाडव्याच्या दिवशी आश्रमाला भेट देत श्री परब यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी श्री परब याने आश्रमाचे काम आणि निराधार व्यक्तीं बद्दलची माहिती सांगितली. नवयुवक कला क्रीडा मंडळाने आनंदाचा दिवस गुढीपाडवा संविता आश्रमाला भेट देत निराधार व्यक्तींसाठी एक प्रकारे साजरा केला तसेच मदत स्वरूपात जीवनावश्यक वस्तू दिल्या याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर, यांच्यासह सत्यवान नाईक, नारायण नाईक, आनंद देऊलकर, राजन मठकर, पत्रकार रुपेश हिराप, सत्यवान हिराप, सचिन साळगावकर, सिद्धेश मसुरकर, ज्ञानेश मठकर, विनायक गावडे, अनिश हिराप, अंकुश मुळीक आदी उपस्थित होते.
ADVT –




